महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

आ. पवारांच्या प्रयत्नातुन साठेनगर येथील अतिक्रमण धारकांचा P. T. R. चा प्रश्न अखेर मार्गी उद्या रविवारी आ. पवारांच्या हास्ते साठेनगर वासियांना पि. टी. आर.चे होणार वाटप

आ. पवारांच्या प्रयत्नातुन साठेनगर येथील अतिक्रमण धारकांचा P. T. R. चा प्रश्न अखेर मार्गी 
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
उद्या रविवारी आ. पवारांच्या हास्ते साठेनगर वासियांना पि. टी. आर.चे होणार वाटप 
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गेवराई प्रतिनिधी 
शहरातील संजयनगर नंतर साठेनगर येथील अतिक्रमण धारकांच्या पि. टी. आर. चा प्रश्न आ. लक्ष्मण पवार यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले आहे त्यामुळे दि. २ आॅक्टोबर रविवाररोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेत आ. लक्ष्मण पवार यांच्या हास्ते पि. टी. आर. चे वाटप करण्यात येणार आहे
शहरातील संजयनगर, साठेनगर, इस्लामपुरा, भीमनगर,अचानकनगर, येयील अतिक्रमण धारकांना पि. टी. आर. मिळवून देण्यासाठी आ. लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली २१ सप्टेंबर २०१२ रोजी  गेवराई शहरातील संजयनगर, साठेनगर, इस्लामपुरा, भीमनगर,अचानकनगर, आदि भागातील गेले तिस वर्षा पासून शासकीय जमीनीवर अतिक्रमण करून  वास्तव्यास असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढला होता त्यावेळी शहरातील १० हाजाराचा जनसमुदाय आंदोलनात सहभागी झाला होता 
 त्यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले होते तत्कालीन जिल्हाधिकारी व आताचे विभागिय आयुक्त सुनिल केद्रेकर यांनी थेट तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान आ. लक्ष्मण पवार यांच्याशी संपर्क करून तुम्ही आंदोलन करू नका तुमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मि स्वतः हा प्रयत्न करीत असे आश्वासन दिले होते त्यावेळी आ. लक्ष्मण पवार यांच्या घराजवळ मोर्चाचे समाप्त करण्यात आला होता 
 तेव्हा पासून आ. लक्ष्मण पवार यांनी गेवराई शहरातील तिस दसका पासुन अनेक जाती धर्माचे लोक शासकीय जमीनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करत असलेल्या अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. पवार यांनी पाठपुरावा करून १५ आॅगस्ट २०२१ रोजी संजयनगर येथील २०७ अतिक्रमण धारकांना पि. टी. आर वाटप केले आहे तर उर्वरित इस्लामपुरा,१ं०७ घराची  भीमनगर, येथील ६० घरांची मोजणी झालेली आहे त्यामुळे इस्लामपुरा भीमनगर,  अचानकनगर, येथील प्रस्ताव लवकरच तयार होऊन मंजुरीसाठी जातील