महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

बसमध्ये चढताना वृध्द महिलेचे मंगळसूत्र पळविले. बसस्थानक परिसरात भूर्रट्या चोरांचा सूळसूळाट


 बसमध्ये चढताना वृध्द महिलेचे मंगळसूत्र पळविले.
 बसस्थानक परिसरात भूर्रट्या चोरांचा सूळसूळाट 

मानवत बसस्थानक परिसरातील घटना 

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. सावरगाव खु. येथील रहिवाशी अनुसया बाई बालासाहेब संमिद्रे वय.७२ व त्यांचे पती बालासाहेब संमिंद्रे हे मानवत बस स्थानक या ठिकाणा वरून गावी जाण्यासाठी पाळोदी मार्गे परभणी एस. टी. बस मध्ये चढत असताना मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना दिनांक ३० सप्टेंबर रोजी घडली आहे. 
या बाबत अधिक माहिती अशी की, मानवत तालुक्यातील मौ. सावरगाव खु. येथील रहिवाशी असणारे वृध्द दापत्य अनुसया बाई बालासाहेब संमिद्रे त्यांचे पती बालासाहेब संमिद्रे हे मानवत बस स्थानकातून आपल्यागावी जाण्यासाठी पाळोदी मार्गे परभणी या एस. टी. बस मध्ये प्रवास करण्यास चढत असताना गर्दीचा फायदा घेत अनुसयाबाई बालासाहेब संमिद्रे यांचे एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडली आहे. 
सदरील या मंगळसूत्रांची किंमत रुपये पन्नास हजार असल्याची माहिती अनुसयाबाई बालासाहेब संमिद्रे व त्याचे पती बालासाहेब संमिद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.