महामार्गावर दररोज अपघात होत असतांना महामार्ग पोलिश फक्त टोलनाक्यार
विधान सभेच्या उप सभापती निलमताई गोऱ्हे यांनी घेतली दखल
बीड - प्रतिनिधी
बीड मधून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर अपघात होऊन निरपराध लोकांचे बळी जात असतांना महामार्ग पिलीस मात्र उस्मानाबाद जिल्ह्याच्या बोदरी हद्दीतील टोलनाक्यार वसुली करत थांबलेले असतात ही बाब विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे निदर्शनास आणून दिल्या नंतर याची दखल घेतली असून या संदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
विधान सभेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे या रविवारी बीड जिल्ह्यात आल्या होत्या , बेकायदेशीर गर्भपात प्रकरण,ऊसतोड मजुरांचे प्रश्न,गर्भ पिशवी शस्त्रक्रिया प्रकरण यावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली या वेळेस दोषींवर कारवाई करण्याबरोबरच या प्रकरणाचा तपास करून दोषी लोक शोधुन काढण्याच्या सूचना दिल्या या नंतर बीड येथील विश्राम ग्रहवर नीलम ताईंनी संवाद साधला यावेळी ऊसतोड मजुरांचे रस्त्यावर होणारे अपघात ,उसतोड मजुरांची शासकिय यंत्रणे मार्फत होणारी आरोग्य तपासणी गर्भपातासारख्या व बालविवाह सारख्या प्रकरणामध्ये कायध्या बरोबरच समाजाची ही काही जबादारी असते अणि समाज जेव्हा ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडायला लागेल तेंव्हा चुकीचे कामे करणारे लोक कायध्याच्य चौकटीत अडकतील अशे त्या म्हणाल्या
रस्त्यात अपघाता संदर्भात बीड शहराजवळून जाणाऱ्या धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होऊन निरपराध लोकांचे बळी दररोज जात आहेत महामार्गावर अनेक ठिकाणी अवजड वाहणे रस्त्यावर थांबलेली असतात महामार्ग पोलीस मात्र कुठेच रस्त्यावर दिसत नाहीत पाडळसिंगी हिथुन टोलनाक्यावर अणि उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या पारगाव टोलनाक्यावर वसुली करत बसलेले असतात पाडळसिंगी ते पारगाव या पन्नास साठ किलोमीटर च्या अंतरावर महामार्ग पोलिस कुठेच दिसत नाही असा प्रश्न नीलम ताई यांना विचारल्या नंतर यांनी हा प्रकार गंभीर असून या संदर्भात आपण पोलीस अधीक्षकांना सूचना देऊ अशे त्यांनी सांगितले यामुळे महामार्ग आणि त्यांची कामाची पद्धत हा प्रश्न ऐरणीवर आला आहे
