महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गेवराई येथे रक्तदान शिबीर व भव्य शोभायात्रा====================गेवराई (प्रतिनिधी) :- स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी आज शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी रक्तदान शिबीर व भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येणार असून या कार्यक्रमास फुले प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गेवराई येथील सावतानगर येथून महात्मा फुले यांच्या प्रतिमेची रथातून सवाद्यासह भव्यदिव्य अशी मिरवणूक सायंकाळी ठिक पाच वाजता निघणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी तसेच फुले प्रेमी नागरिकांनी या भव्य अशा मिरवणूकीस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे. तसेच सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूकीचा मार्ग सावतानगर, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हेर वेस, मार्गे बेदरे गल्ली, देवीचे मंदिर, मेन रोड, चिंतेश्वर गल्ली, तहसील रोड या मार्गाने येवून सावतानगर येथे मिरवणूकीचा समारोप होणार आहे असे आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.