महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

शक्तिपीठ..! सौ. प्रतिक्षा मुळे -: आदर्श व्यक्तिमत्त्व

शक्तिपीठ..! 

सौ. प्रतिक्षा मुळे -: आदर्श व्यक्तिमत्त्व 

     चांगल्या "बाई" एखाद्या संस्थेच्या आणि ग्राहकांच्या सेवेत आल्या म्हणजे, कोणत्याही व्यासपीठावर आमुलाग्र बदल घडवून आणण्याची जिद्द तिच्यात असते. म्हणून तिला  नवदुर्गेचे नामाभिधान प्राप्त झाले आहे. शहरात नावारूपास आलेल्या गोदावरी मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट बॅन्केच्या मॅनेजर (व्यवस्थापक) म्हणून कार्यरत असलेल्या सौ. प्रतिक्षा प्रभाकर मुळे यांनी संस्था आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून आपली ओळख निर्माण केली. बॅन्क व्यवहारात त्या जवळपास दहा वर्षापासून कार्यरत आहेत. नवरात्र उत्सवा निमित्ताने सोमवार ता. 26 सप्टेंबर 2022 रोजी, पहिल्याच दिवशी, पहिल्या माळेला त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा आजवरचा अनुभव, प्रवास जाणून घेतला. 
   त्या सांगत होत्या, आमचे कुटुंब मादळमोही ता. गेवराई जि.बीड येथील रहिवाशी आहे. खूप दिवस झालेत, आम्ही गेवराई शहरात स्थाईक झालोत. परिस्थिती बेताची असल्याने घरात बसून राहण्यापेक्षा काही तरी करावे. कुटुंबाला तेवढाच आर्थिक हातभार लागेल. त्याशिवाय, 
  आपल्या शिक्षणाचा उपयोग करावा, असे वाटले. योग जुळून आला. माझे सासरा श्रीधर गणपतराव मुळे यांनी प्रोत्साहन दिल्याने घराबाहेर पडण्याचे धाडस केले. संस्थेचे मार्गदर्शक पराड सर, स्व. बैरागी सर यांनी ही संधी दिली. आर्थिक व्यवहारशी निगडित असलेल्या बॅन्के सारख्या अतिशय जबाबदारीच्या क्षेत्रात काम करता आले. दहा वर्ष झाली टिकून आहे. प्रमाणीकपणाने कुठेही काम करत राहीले की, अडचणी येत नाही. अशी प्रांजळ भावना त्यांनी बोलून दाखवली. पती, एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा प्रज्वल यास मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे आहे. मुलगी प्रांजल हिला रंगसंगतीची आवड असून, स्वतःच्या आयुष्यासह इतरांच्या ही आयुष्यात तिला आनंदाचे रंग-तरंग भरवायचे आहेत. एक कर्मचारी ,अधिकारी म्हणून काम करताना सौ. मुळे यांनी  आलेले अनुभव सांगितले. सौ...बका एका लिखा.. ! हे तत्व माझ्या कामी आले. पैसे घेऊन ही, नाही म्हणणारे ग्राहक भेटले. तेव्हा खूप मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे शल्य बोलून दाखविले. पण, संस्था, कर्मचारी पाठीशी ठाम उभे राहीले. 
स्त्री भ्रूण हत्या पाप आहे. एकीकडे आम्हाला अंगणातील तुळस म्हणायचे आणि दुसरीकडे "तिच्या" नरड्याला नख लावायचे. हा दुटप्पीपणा आहे. या चुकीच्या मानसिकतेतून समाजाने बाहेर पडण्थाची गरज त्या व्यक्त करताना त्यांच्यातली "आई" दिसली. महिलांनी आत्मविश्वास जागृत ठेवून काम करायले हवे. पैशाचे योग्य नियोजन केले पाहिजा. बचत करून चांगली सवय लावून घेणे , हा अतिशय चांगला गुण आहे. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आनंदी जीवन जण्याचे गुपित आपल्याच वागणूकीवर अवलंबून असते. कुठे ही काम करत असताना स्वतःशी प्रामाणिक राहावे, अशी माफक अपेक्षा ही गोदावरी मल्टीस्टेट अर्बन को-ऑप बॅन्केच्या मॅनेजर सौ. मुळे यांनी व्यक्त करून समाजातील सर्व "नवदुर्गांना" नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.

सुभाष सुतार 
( पत्रकार )