महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

नवदुर्गा : निलम वळवी:- कामात "राम" शोधणारी प्रमाणीक परिचारका

नवदुर्गा  : 

निलम वळवी:- 
कामात "राम" शोधणारी प्रमाणीक परिचारका 

     त्या सरकारी दवाखान्यात परिचारिका आहेत. पाच वर्ष झाली सेवेत आहेत. आधी ड्युटीच, या तत्वाशी जोडून कार्यरत आहेत. खूप समजदार आहेत. कोणत्याही रुग्णाशी आपुलकीने विचारपूस करून मदत करतात. त्यांना कंटाळा येत. धसमुसळेपणा करत नाहीत. अशी खासीयत असलेल्या कु. निलम वळवी  नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा शोभून दिसतील, इतक्या सहज सुंदर स्वभावाने नावारूपास आल्यात. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात परिचारका म्हणून सेवेत आहेत. नवदुर्गा म्हणून त्यांची भेट घेतली आणि त्यांना बोलते केले. 
     अक्कलकुवा तालुक्यातील कौली गवार, जि. नंदुरबार येथून आल्यात. आदिवासीबहुल परिसरातून आहेत. घरात आई आणि चार बहिणी आहेत. लहान असतानाच, एप्रिल 2012 रोजी एका आजारपणात वडील गेले. आईने शिक्षण दिले. एक बहिण पोलीस आहे. वडलांच्या आजारपणात सरकारी दवाखान्यात यायचे जायचे. परिचारकांची सेवा मनात घर करून गेली. त्यामुळे, या क्षेत्रात काम करायची इच्छा झाली. खर तर, पोलीस व्हायचे होते. आता रुग्ण सेवाच चांगली वाटते. याच ठिकाणी राहून काम करायचे आणि मोठ्या पदावर जायचे स्वप्न आहे. त्यांचा कोविड चा अनुभव अंगावर रोमांच उभे करतो. तो काळ अतिशय भयानक होता. त्याची आठवण ही नको वाटते. लोक एकमेकांशी फटकून वागायचे, तेव्हा खूप वाईट वाटायचे. त्या घाबरत नव्हत्या. कशाचीच भिती वाटत नाही. एकदा जायचेच आहे. तो ठरवारा, आपण कोण ? त्यामुळे, त्यांनी कोविड वार्डात बिनधास्त काम केले. कधी आणि केव्हा ही बोलावले तरी एका काॅलवर हजर असतात. त्यांना एकदा नव्हे तर दोनदा कोविड झाला. सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. घरातच राहील्या. घाबरल्या नाहीत. वडील हयात नाहीत. पाठीराखा भाऊ नाही. आईला मुद्दाम सांगितले नाही. त्या घाबरून गेल्या असत्या. शेजारची सर्वजण मदत करायचे पण जेवणाचे ताट दुरून ठेवून निघून जायचे. त्याचे त्यांना वाईट वाटायचे. एक प्रकारची अस्पृश्यताच अनेकांनी अनुभवली. लोक भितीने गेले. त्यांना खूप वाईट वाटते. त्या उत्तम डान्स करतात. 
नृत्य करायला खूप आवडते. नवरात्रात मनसोक्त गरबा खेळायला आवडते. वाचायला ही आवडते. रुग्णात भेद करायला आवडत नाही खोटे बोलायचे टाळतात. एचआयव्ही रुग्ण भित भित येतात. काही वेळा त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. लोक अंतर ठेवून वागतात. ते ही माणसेच आहेत. एचआयव्ही हा रोग कशाने होतो. एवढी समज प्रत्येकाला असतेच असते. म्हणून, त्या रुग्णां विषयी भेदभाव करू नये, या मताची आदर्श परिचारका मनाला भावणारी वाटावी, एवढी कर्तव्याशी एकनिष्ठ राहून रुग्ण सेवा या नवदुर्गे ने आजवर केली आहे. गरजू माणसे सरकारी दवाखान्यात येतात तेव्हा अनेकांना नीट माहिती नसते. ते कावरेबावरे होतात. अशा वेळी कुणीतरी आपुलकीने बोलणारे भेटले की, त्यांना ही बरे वाटते. अशा रुग्णांनी त्यांनी मदत केली आहे. 
निलम यांना 
कामात हॅपी राहयला आवडते. सकाळी वेळेत येतात मात्र सायंकाळपर्यंत कामात राहतात. कामात राम शोधता येतो. मनाला केवढे समाधान आहे. त्याची बरोबरी करता येणार नाही. त्या म्हणाल्या, 
गेवराई येथे जाधव नावाच्या खूप छान सिनियर होत्या. त्यांनी चांगल्या गोष्टी शिकवल्या, त्याची जाणीव करून दिली. त्यांचे मार्गदर्शन मोलाचे राहीले आहे. मुलगी घरची लक्षमी असते. तीने खूप शिक्षण घेऊन समाज, घर आणि देशसेवा करावी. असंख्य संधी उपलब्ध आहेत. स्त्री भ्रूण हत्या होऊच नयेत, या दृष्टिकोनातून समाजात चर्चा झाली पाहिजे. कोविड काळातली छानशी आठवण करून देत म्हणाल्या की,
केलेल्या कामाची दखल घेऊन शासनाने, सामाजिक संघटनेने आमचे कौतुक केले. गेवराई ( बीड  ) शहरातील गोधडी धाम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आमच्या हस्ते  दीपप्रज्वलन केले. तो अनुभव आणि झालेला सन्मान आयुष्यभर लक्षात राहील, अशी त्यांची भावना आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, कामात राम शोधला म्हणजे कौशल्याची भर पडते. कारण, समाजभान राखून काम करणारी माणसे समामाची आदर्श ठरतील. निलम ताई आपल्या कार्याला मानाचा सॅल्युट..! 

सुभाष सुतार 
( पत्रकार  )