सिंदखेड येथील गणपत बाबा गणेश मंडळाच्या वतीने टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक
----------------------------------------
शुभम घोडके / गेवराई
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे सिंदखेड या गावात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला उधान आले. टाळ मृदंगाच्या गजरात निराळात वातावरण अगदी चैतन्यमय झाले असून भक्तिमय वातावरणात आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभंगाच्या तालावर आणि टाळांच्या गजरात गणेश भक्त नाचण्यासाठी ठेका धरत होते लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी अख्ख सिंदखेड एकवटले. दरम्यान ज्या थाटात गणपती बाप्पांचे स्वागत झालं, त्याच थाटात सिंदखेड येथिल गणपत बाबा गणेश मंडळाच्या गणपती बाप्पांना निरोप देखील देण्यात येत असताना. विसर्जनासाठी गणेश भक्त मार्गस्थ झाले होते. देखील पावसाचा उत्साहात स्वागत केलं आणि तेवढ्यात उत्साहात टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावरण यावेळी पाहायला मिळालं.