रिपाई एकतावादीच्या वतीने ऊसतोड मजूर मुकदमाचा रविवारी मेळावा
युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे उपस्थित राहणार - शैलेश पोटभरे
बीड, प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने ऊसतोड मजूर, मुकादमाचा भव्य मेळावा तालुका परळी मोजे डाबी येथे दि. 11 सप्टेंबर रोजी रविवार सायंकाळी सात वाजता आयोजित केला असून यावेळाव्याचे उद्घाटक म्हणून रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय युवा नेते तथा ठाणा म. पा. स्थायी समिती सभापती भैय्यासाहेब इंदिसे हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बीड जिल्हाध्यक्ष शैलेंद्र पोटभरे हे राहणार आहेत. ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ,त्यांना न्याय मिळण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केला आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते धम्मपाल भालेराव जिल्हाध्यक्ष लातूर ,पंडितराव झिंजुर्डे जिल्हा सचिव बीड ,बीड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रख्यात शाहीर मनोज राजा गोसावी यांचा भीम गीताचा दणदणीत कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक मा मनोज जोगदंड युवा ऊसतोड कामगार मुकादम जिल्हाध्यक्ष रिपाई एकतावादी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.