जैन समाजाचे जितेंद्र चोरडीया यांचा 28 दिवसांपासून उपवास सुरू
गेवराई प्रतिनिधी
प्रत्येक समाजात आपल्या ईश्वराची मनोभावे पुजा ,प्रार्थना करत राहणं व आपल्या धर्माच्या परमपरेनुसार कार्य करत राहणे गोर गरीबांना मदत करणे व निरंकार उपवास धरले जातात
हे कार्य प्रतेक जन करत असतो असेच गेवराई येथिल युवक उपवास करत आहे.
शहरातील मोंढा नाका येथिल प्रसिद्ध व्यापारी अशोकचंद चोरडिया यांचे चिरंजीव जितेंद्र अशोकचंद चोरडीया यांनी जैन धर्माच्या प्रर्थेने मागिल 28 दिवसा पासुन उपवास धरले आहेत व ते आणखी सुरुच आहेत मागिल 28 दिवसात त्यांनी फक्त गरम केलेले पाणीच पिले आहेत.
उपवासा दरम्यान दिवस असतांना फक्त गरम केलेले पाणी प्यावे लागते अन्न नाही फळ नाही दुध ही नाही केवळ गरम केलेले पाणीच घेतात .
भगवान महावीर यांनी सांगितलेला मार्गात जैन समाजातील साधू साध्वी आणी श्रावक-श्राविका यांच्या कडुन जो तपस्याचा मार्गात व या उपवासा दरम्यान (व्रत्तामध्ये) केवळ गरम पाणी प्यावे लागते
अन्न ,फळ,दुध असे काहीही चालत नाही तसेच काम ही नाही
अशा प्रकारे जितेंद्र चोरडिया यांनी 28 दिवसांपासून भगवान महावीर यांचे नामस्मरण करत उपवास धरले आहेत त्यांच्या उपवासा व तब्येती बद्दल आमच्या प्रतिनिधीनी त्यांच्याशी विचाले असता त्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की अध्यापही मला कसल्या प्रकारचा त्रास नसून भगवान महावीर यांच्या आशिर्वादाने मी माझे उपवास सुरुच ठेवणार आहे