शाळापुर्व तयारी मेळावा क्रं 2तसेच प्रवेशोत्सव,मातापालक सभा संपन्न
नंददत डेकाटे
भिवापुर प्रतिनिधी
भिवापुर पंचायत समिती अंतर्गत
जि.प.प्रा.शाळा. खातखेडा केंद्र-महालगाव पं.स.भिवापुर जि.नागपूर येथे आज दि.29/0/6/2022 ला शाळापुर्व तयारी मेळावा क्रं 2तसेच प्रवेशोत्सव,मातापालक सभा घेण्यात आली.
या कार्यक्रमाला मान.कवडुजी थेरे (सरपंच साहेब सालेभट्टी दंदे) माननीय. श्री.संदिपजी थेरे(अध्यक्ष. शा.व्य.स.) सौ.शोभाताई नारनवरे (अंगणवाडी पर्यवेक्षिका) यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, अभिवादन करुन शाळापुर्व तयारी मेळावा क्रं.2 चे उद्घाटन करण्यात आले.
यात सर्वप्रथम नवागंताचे व त्यांच्या माता पालक यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्टाँल क्रं.1वर नाव नोंदणी/ वजन उंची ...चार ही दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची वजन /उंची घेण्यात आली.
स्टाँल क्रं.2 शारीरिक क्षमता विकसित उड्या मारणे याप्रमाणे शारीरिक ...
स्टाँल क्रं.3 बौद्धिक क्षमता ..आकार लहान, मोठा फरक ओळखणे,दिलेल्या वस्तुंचा क्रम लावणे.जोड्या लावणे.
स्टाँल क्रं.4.सामाजिक आणि भावनात्मक विकास क्षमता.. आपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे(आई,बाबा,आजी,आजोबा)खेळात सहभागी होणे.स्वच्छ नीटनेटके राहणे.आत्मविश्वासाने बोलने.
स्टाँल क्रं.5 भाषाविकास क्षमता..चित्रपाहुन वर्णन करणे,चित्रावरून गोष्ट सांगणे,म,स,ब,त,अ,क,र अक्षरे ओळखणे.तसेच त प म स क अक्षरे पाहुन लिहीने.
स्टाँल क्रं.6 गणनपुर्व तयारी..दिलेल्या वस्तु कमी..जास्त ओळखणे.विविध आकार ओळखणे. अंक (८, २, १, ५, ६, ७, ३, ९, ४)ओळखणे तसेच दिलेल्या वस्तु(✒️✒️✒️,📗📗,🍬🍬🍬🍬,🍫🍫🍫) मोजणे.
स्टाँल क्रं.7वा. समुपदेशन व Card तपासणी करणे... यात स्टाँल क्रं.१ ते ६ वरील क्षमतांचा विकास विद्यार्थ्यांनी कितपत केला तो पालकांना समजावून देण्यात आले व काही क्षमतांच्या उणिवा दुर करण्यास उद्बबोदन करण्यात आले.
१००% पटनोंदणी झाली. या कार्यक्रमाला गटसाधन केंद्र भिवापुर येथील साधनव्यक्ती श्रीमती मेघाताई गुरुनुले मँम हजर होत्या त्यांनी मातापालक मेळाव्यातील,पालकांचे नवागंताचे पुष्प देऊन स्वागत केले.सौ.संध्याताई चंद्रकांत शेगोकर(मु.अ) यांनी मार्गदर्शन केले. आयु.राजु नवनागे(स.अ) यांनी शाळापुर्व तयारी करीत असतांना विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याची पालकांची जबाबदारी आहे. सौ.सुमनताई गायकवाड(अं.से) श्री.निखिल मुन(स्वयंसेवक)सौ.मंदा मसराम, गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.शाळेतील संपूर्ण विद्यार्थी हजर होते.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खाऊ देण्यात आला अशाप्रकारे शाळापुर्व तयारी मेळावा क्रं.2 घेण्यात आला.