महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

जीवन गौरव सन्मान • बाबा भांड यांचे प्रतिपादन,३० शिक्षक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानितअंकुरनाऱ्या भावी पिढीला घडविणाऱ्या शिल्पकारांचा सन्मान होणे योग्यच...!

जीवन गौरव सन्मान • बाबा भांड यांचे प्रतिपादन,३० शिक्षक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अंकुरनाऱ्या भावी पिढीला घडविणाऱ्या शिल्पकारांचा सन्मान होणे योग्यच...!

 औरंगाबाद प्रतिनिधी 

 औरंगाबाद , शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्काराचे एक विदयापीठ आहे. विदयार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य करून शिक्षक हा ख-या अर्थाने सृजनाचा साधक आहे.असे प्रतिपादन राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष बाबा भांड यांनी केले.प्रसिध्द बालगायक राज डोळस व सम्राट डोळस यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. जीवन गौरव शिक्षक पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकत्रित आले  त्यांनी आपल्या माता - पिता , कुटुंबीयांना सोबत आणून पुरस्काराचा मान वाढविला शिक्षकांच्या या उत्साहाने मी भारावून गेलो आहे. शिक्षकांनी सोबत आणलेल्या ज्येष्ठांचा वडीलधाऱ्यांचा सन्मान राखण्याची भूमिका कायम ठेवली तर या पुरस्काराची सार्थकता खऱ्या अर्थाने वाढेल, असे प्रतिपादन पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक मा. खासदार प्रो.डाँ. सुनिल गायकवाड यांनी केले. सुत्रसंचलनकार प्रा.भगवान विशे यांनी शाहू फुले आंबेडकर यांचा इतिहास संचलनात उलगडला.पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत बाबा भांड पुढे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे आहे. पुरस्कारार्थी प्रतिनिधी म्हणून डाँ.वंदना जाधव,प्रा.डाँ.सुनिल चव्हाण यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याची व ' जीवन गौरव ' मासिकाच्या वाटचालीची प्रशंसा केली . या मासिकाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्व पुरस्कारर्थी सर्वतोपरी सहकार्य करत राहू. भविष्यात आम्ही कुठेही असू तथापि ' जीवन गौरवला हवे ते सहकार्य यापुढे आवर्जून करत राहू , अशी ग्वाही दिली . सकाळी पहिल्या सत्रात राज्यस्तरीय निबंध व नवोपक्रम  स्पर्धेचे बक्षीस वितरण कमलेश बोर्डे,चंदेलसिंह बैस यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी  दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने ३० शिक्षकांना सन्मानित करण्यात आले . यावेळी प्रोफेसर डॉक्टर वाल्मीक सरोदे, एडवोकेट शिरीन वारे, संपादक अरुण सुरडकर, कर सल्लागार सुभाष मगरे, जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे, मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांची मंचावर उपस्थिती होती.
     बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालयातर्फे रविवारी  श्रीमती अश्विनी धाट उस्मानाबाद, गणेश कुंभारे भंडारा, महादेव हवालदार सांगली, बाळासाहेब निकाळजे औरंगाबाद यांच्यासह राज्यातील ३० शिक्षकांना व निबंध लेखन, नवोपक्रम स्पर्धेतील २० विजेत्या शिक्षकांना पुरस्काराने सम्मानित करण्यात आले . हा कार्यक्रम रविवारी २२ मे रोजी शहरातील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी सभाग्रहात औरंगाबाद येथे आयोजित केला होता . अध्यक्षस्थानी  प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत बाबा भांड होते . या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन संसद रत्न खासदार प्रोफेसर डॉ. सुनिल गायकवाड यांच्या हस्ते झाले . व्यासपीठावर प्रो. डॉ.वाल्मीक सरोदे,  शिरीन वारे,अरुण सुरडकर, सुभाष मगरे, रामदास वाघमारे, संदीप सोनवणे,प्रा.भगवान विशे, संदीप ढाकणे,मीरा वाघमारे, पुढे बाबा भांड म्हणाले, शिक्षकांनी स्वत: शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणा-याने सतत शिकत राहायला हवे. त्याची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडू नये शिक्षकांनी आयुष्याच्या अंतापर्यंत विदयार्थी म्हणूनच जगायला हवे. त्यांनी शिकण्याची इच्छा कधीही मरू देता कामा नये. शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो.शिक्षक हा नवी पिढी घडवतो . पुढे डाँ. खासदार गायकवाड म्हणाले की,या शिक्षकांना पिढी घडवताना अनेक चढउतारांना सामोरे जावे लागते . वैयक्तिक सुख दुःखापेक्षा अध्यापनसेवेशी एकनिष्ठ राहणाऱ्या या शिक्षकांना सन्मानित केले पाहिजे . त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली पाहिजे, हे काम जीवन गौरव परिवार करत आहे याचा मला अभिमान आहे. 
या पुरस्कार सोहळ्याचे प्रा.भगवान विशे, संदीप ढाकणे यांनी सूत्रसंचालन केले. आभार महादेव हवालदार, हनुमंत पडवळ यांनी मांडले.या सोहळ्यास फाऊंडेशनच्या सचिव मीरा वाघमारे , अन्सीराम वाघमारे, प्रेम सपाटे,ऋत्विक वाघमारे , प्रेरणा अजादे , प्रणाली उघडे, अमर सपाटे , गौरव वाघमारे, दिपक वाघमारे, संदीप अझादे, नीलेश उघडे, कैलास वाहूळ, संजय हिंगोलोकर , कल्याण अन्नपूर्ण , जगन्नाथ सुपेकर,अरुण सुरडकर  व राज्यभरातील जीवन गौरवच्या टिमने सहकार्य केले आहे .