अमरसिंह पंडित यांची संतुआई देवस्थानला भेट
-- विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन
गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील सिसरमार्ग येथील श्रीक्षेत्र सुभान संतुआई संस्थांनाला दि.२० मे रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भेट दिली.ग्रामस्था सोबत विविध विकास कामा संदर्भात चर्चा केली
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील ग्रामदैव श्रीक्षेत्र सुभान संतुआई संस्थांनाला दि.२० मे रोजी दुपारी दोन वाजता भेट दिली देवीचे मनोभावे दर्शन घेतले.संतुआई देवीच्या विविध विकास कामासाठी आतापर्यंत अमरसिंह पंडित यांनी पाणी पुरवठा विहीर 10 लक्ष रु, पथदिवे पाच लक्ष रुपये,भक्त निवास पाच लक्ष रुपये व सभामंडप शुशोभिकरणासाठी दहा लक्ष रुपये असा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.पुढील काळात विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले
भैय्यासाहेबांनी ग्रामस्थांसमवेत संतुआई देवी परीसरातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली
यावेळी माजी सभापती पांडुरंग कोळेकर,खरेदी विक्री संघाचे संचालक सोमेश्वर गचांडे, सुरेश पवळ, सरपंच कैलास नलावडे,ग्रामपंचायत सदस्य सुरेश मार्कड, नारायण कोळेकर, बाळासाहेब मार्कड, राजेश ओस्तवाल, माऊली पवळ,शेख एजाज,राहुल मगर,आसाराम पवळ,संतोष शेजाळ,यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
