बीड जिल्ह्याचे नाव मोठे करीन - फकिरा भंडारे
महाराष्ट्र सरकारने फकिराला दत्तक घ्यावे - ॲड. सुभाष निकम
गेवराई : प्रतिनिधी :
जिल्ह्य़ाचा चा भूमिपुत्र म्हणून आम्हाला फकिराचा अभिमान असून, त्याच्या पुढील यशासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने त्याला दत्तक घ्यावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ सुभाष निकम यांनी येथे केले आहे. शनिवार ता. 21 रोजी फकिरा भंडारे यांचा तालुक्यातील कहार समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य पी.टी.चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाह, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, जेष्ठ पत्रकार
सुनील पोपळे, पत्रकार सुभाष सुतार, बंजारा समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, कहार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण लिंबोरे , राम लिंबोरे ,कहार समाज महिला आघाडीच्या दैवशाला लिंबोरे यांची उपस्थिती होती.
मुष्टियुद्ध स्पर्धेत भाग घेऊन भारतात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला आलेला काली उर्फ फकिरा यांनी
डब्ल्यू .डब्ल्यू. एफ.स्पर्धेत चमकदार कामगिरी करून देशाचे नाव केले आहे. सत्काराला उत्तर देताना ते
म्हणाले की, मी आपल्या बीड जिल्ह्याचे नाव नक्कीच मोठे करीन. समाजाचा व तुमचा आशीर्वाद माझ्या पाठिशी असूदेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मासेमारी करून उदरनिर्वाह करणारे गेवराई तालुक्यातील या सूरळेगाव या ठिकाणचे रहिवासी असलेले फकिरा उत्तम भंडारे उर्फ काली शेट यांनी डब्यू.डब्ल्यू.ई. स्पर्धेत देशात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांका चे पारितोषिक पत्कवल्याबद्दल कहार सामाज बांधवांनी सदरील कार्यक्रम आयोजित केला होता. आलेल्या हृदय सत्कार सोहळ्या ला उत्तर देताना म्हटले आहे.
फकिरा यांचा गेवराई तालुका कहार सामाज वतीने गेवराई येथे भव्य सत्कार ठेवण्यात आला होता.
भावी स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी,
स्पर्धेसाठी येणारा खर्च शासनाने उचलावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जे.डी. शहा यांनी आपल्या भाषणातून केली. जेष्ठ विधिज्ञ सुभाष निकम म्हणाले की,राज्य सरकार ने इतर खेळा प्रमाणे या खेळाला देखील निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पी.टी. चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की, फकिराला एका समाजाच्या चौकटीत बसवणे योग्य नाही त्याचा संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण चव्हाण यांनी केले.
