आष्टी प्रतिनिधी
महाराष्ट्र अनेक सुख दुःखांना झेलत ताठ मानेने उभा आहे.इथला संस्कृतीने देशाला आदर्श दिला.सप्तरंग एकत्र घेऊन नांदणारा हा मुलुख आहे.म्हणून महाराष्ट्र अनेक अर्थाने समृद्ध राष्ट्र आहे.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात एक मे रोजी ध्वजवंदना नंतरच्या कार्यक्रमात ते बोलत होते.प्रारंभी प्रा.रवि सातभाई यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.अभय शिंदे यांचे महाराष्ट्र दिन,कामगार दिनानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न झाले.यावेळी प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य अविनाश कंदले यांनी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष व्ही.एल.शिंदे,सचिव अतुल शेठ मेहेर,पिंपळेश्वर प्राचार्या पवार मॅडम,अतिथी श्याम शिरसागर,तसेच उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे, कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव मॅडम,प्रा.अशोक भोगाडे,प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ.सुहास गोपने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.जे.एम.पठाण यांनी आभार मानले.
