उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने पत्रकार सुभाष सुतार यांचा झाला गौरव
गेवराई प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, येथील गेवराई तहसील कार्यालयाने जेष्ठ पत्रकार तथा स्तंभलेखक सुभाष सुतार यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रविवार ता. 1 मे. रोजी सकाळी आठ वाजता, तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते व आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील पुरस्कार देण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, पोनि पेरगुलवार, पोलीस उपनिरीक्षक भोसले मॅडम, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, नात. रामदासी , नात. तहसीलदार प्रशांत जाधवर , पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर यांची उपस्थिती होती.
गेवराई तहसील प्रशासनाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीच्या पुरस्कारासाठी
उत्कृष्ट कर्मचारी म्हणून काम करणारे
खेडकर नामदेव, कदम,
जितू लेंडाळ, पत्रकार सुभाष सुतार , वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उत्कृष्ट अधिकारी म्हणून गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक महादेव चिंचोळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.
भोरे यांना पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण रविवार ता. 1 मे. रोजी सकाळी आठ वाजता पार पडले. तहसील प्रशासनाच्या वतीने जेष्ठ पत्रकार तथा स्तंभलेखक सुभाष सुतार यांना जाहीर झालेला उत्कृष्ट कार्य पुरस्कार माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते व आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. पत्रकार सुतार यांनी आजवरच्या पत्रकारितेत
विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांना शब्दबद्ध करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. समाजातले अनेक विषय त्यांनी शासन दरबारी मांडले आहेत. या कार्याची दखल घेत, गेवराई तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाने त्यांची निवड केली. पुरस्कार मिळाल्या बद्दल पत्रकार सुभाष सुतार यांचे विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनेचे अध्यक्ष, नगरसेवक, वकील, डॉक्टर ,
पत्रकारांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
