महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हंबर्डे महाविद्यालयात इंग्रजीतून वक्तृत्व स्पर्धा

हंबर्डे महाविद्यालयात इंग्रजीतून वक्तृत्व स्पर्धा

आष्टी प्रतिनिधी 
विल्यम शेक्सपियर जयंती व जागतिक पुस्तक दिनानिमित्त हंबर्डे महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने इंग्रजीतून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना ग्रंथालयाकडून त्यांच्या आवडीची पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली.
प्रसिध्द इंग्रजी साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांची जयंती जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरी केली जाते. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अ‍ॅड बी डी हंबर्डे महाविद्यालयात संस्थाध्यक्ष श्री किशोर हंबर्डे आणि सचिव श्री अतुलकुमार मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंविला. विल्यम शेक्सपियर, इंग्लिश लँगवेज व इम्पोर्टन्सऑफ बुक्स हे विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवले होते. प्रथम पारितोषिक आशुतोष खाडे (तृतीय बीसीए), द्वितीय पारितोषिक कु सोलेहा शेख (बारावी विज्ञान) व तृतीय पारितोषिक कु पूनम दराडे (द्वितीय कला) यांनी मिळवले. उत्तेजनार्थ पारितोषिक कु आनम शेख व कु दिप्ती मिसाळ यांना देण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोपान निंबोरे यांनी अध्यक्षीय समारोप करताना इंग्रजी भाषेचे महत्व विषद करून पुस्तकांचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित केले. इंटरनेट व समाज माध्यमांतून मिळणारे ज्ञान व माहिती विश्वासार्ह नसते म्हणून ग्रंथ हेच आपले गुरू आणि मित्र आहेत असे सांगितले. स्पर्धेसाठी प्रा सचिन कल्याणकर, डॉ अभय शिंदे व डॉ निखीलकुमार बनकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ग्रंथपाल डॉ सुनिल मुटकुळे यांनी सर्वांचे आभार मानले.