आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त आष्टी ग्रामीण रुग्णालयातील महाआरोग्य मेळाव्यात आयुष्यमान कार्डचे वितरण
आष्टी प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर येथे आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त महाआरोग्य मेळावा घेण्यात आला. यात सर्जरी,बालरोग,महिला आरोग्य,ई.एन.व्ही.,नेत्ररोग,दंतरोग,विविध विभागातील रुग्णावर मोफत तपासणी व उपचार,शस्त्रक्रिया करण्यात आली.या आरोग्य मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्डचे वितरण विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते करण्यात आले.आयुष्यमान गोल्डन कार्डचे फायदे लक्षात घेऊन जास्तीत जास्त गरजू आणि पात्र नागरिकांनी गोल्डन कार्ड चा लाभ घ्यावा.असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे,डॉ.संतोष जावळे, जिल्हाप्रमुख श्रीराम राठोड,आरोग्य मित्र उमेश जिभकाटे यांनी केले.या शिबिराला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. आरोग्य मित्र उमेश जिभकाटे यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.
