महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

झूंड"...…..

"झूंड"...…..

चित्रपटविषयीं खूपच आकर्षण निर्माण झालं होतं. समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अधून मधून चित्रपटाचे काही शॉट ही काहीजण अपलोड करत असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळं आज ठरवून सुटीचा पूर्ण फायदा घेत कुंटूंबासह एकदाचा सिनेमाहॉल गाठला. त्या परिसरात गेल्यानंतर मी सिनेमा बघायला आलो कि एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आलो असा प्रश्न पडला. कारण तिथे गेल्यावर चळवळीतले प्राध्यापक, पत्रकार, कार्यकर्ते, मित्र अनेकजण भेटले. माझ्या सारखीच त्यांना देखील चित्रपट  बघण्याची ओढ लागली होती. सगळ्याना यां चित्रपटात नेमकं आहे तरी काय? हे जाणून घ्यायचे होते. या सिनेमांत अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेंत. सर्वच सांगणे कठीण आहे. त्यासाठी आपल्याला हा सिनेमा एकदा बघावाच लागेल. बॉलिवूडच्या प्रत्येक चित्रपटात सलाम वालेकूम, राम राम,नमस्कार, सत श्रीकाल, अशा प्रकारच्या सर्वं धर्मियांचा जयघोष सहजच आपण पाहिलात. परंतु 'जयभिम "चा जयघोष कधीच पाहीला नाही. तो पहिल्यांदाच यां चित्रपटात आपल्याला बघता येईल. या चित्रपटात नागराज मंजुळेनी त्यापुढे जाऊन चक्क महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत, एक जल्लोष,आनंदोंउत्सव साजरा केला आहे. आजपर्यंत बॉलीऊड मध्ये कोणीही सखीचा लाल करू शकला नाही. किंबहुना हिम्मत देखील दाखवू शकला नाही. मात्र नागराज मंजुळेनी ते करून दाखवलं. आणि लाखो आंबेडकर वाद्याच्या गळयातला ताईत बनला. ज्या फिल्म इंडस्ट्रीने कलाकारांना लाथाडल, वंचित ठेवलं अशा झोपडपट्टीतल्या कलाकारांना सोबत घेऊन नागराज मंजुळेनी जीवनाचं वास्तव मांडलं. संधी मिळाली तर आम्ही त्याचं सोनं करू हे फुटबॉल खेळातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. हजारो वर्षे आम्हाला आमच्या समान न्याय हक्कापासून,कोसो दूर ठेवलं. आम्हाला आमची पात्रता सिद्ध करू दिली नाही. या चित्रपटातला एक क्षण आवर्जून सांगावा वाटतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वर्गणी मागण्यासाठी मूल गेली असता,जयंतीसाठी मी पैसे देणार नाही. परंतु वस्तीसाठी चांगल काम करत असाल तर मी नक्की मदत करेन. असं म्हणनारा व्यक्ति तिच मुलं बाहेर देशात खेळण्यासाठी जात असतांना पैसे कमी पडतात म्हणून मुलांना स्वतः पैसे नेवून देतो. हा प्रसंग यां ठिकाणी विचार करणारा आहे. बॉलिवूड मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आजपर्यंत कुठेही स्थान दिले गेले नाही. कुठे असेल तर अपवाद समजावा. यां चित्रपटात चक्क भीमजयंतीची मिरवणूक दाखवली आहे. मिरवणुकीत पंचशील ध्वज दाखवले आहे.यामुळे अर्थातच मनुवाद्याच्या बुडाला आग लागली असणारच . म्हणून तर यांची उलट सुलट चर्चा सुरु आहे. नागराज मंजुळे ह्यांनी दाखवलेल्या धाडसाला त्यांच्या कर्तृत्वाला मनस्वी सलाम करावाच लागेल.चित्रपटातील जयंती सोहळ्यात निळ्या झेंड्या सोबतच बौद्धाचा पंचशील ध्वज ही दिमाखात फडकताना दाखवला आहे. हे बघत असतांना अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. एक विशेष,भीमजयंती निमित्त सर्वजण बेधुंद नाचत असतांना ऍम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून देतांना दाखवले आहे. हे चित्र देखील मनाला समाधात देणारे आहे.
देशभर हा सिनेमा प्रदर्शित झालाय. तूफान गाजतोय, वाजतोय, चित्रपटावर कौतूकाचा वर्षाव सूद्धा होत आहे. मानवतावाद जोपासणारें,फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांचे परीवर्तनवादी विचार, चळवळ, संघर्षांचा वारसा झोपडपट्टीतच जिवंत आहे. हे नागराज मंजूळे यांनी दाखवून दिले आहे. नागराज मंजुळे हे बौद्धधर्मात जरी जन्मले नसले तरी त्यांनी खरा आंबेडकरवाद स्वीकारला आहे. त्यांचा कोणलाही हेवा वाटेल असं दमदार कामं त्यांनी करून दाखवले आहे. नागराज मंजुळे यांनी  फॅन्ड्री ,सैराट, सारखे वास्तववादी चित्रपट दिले आहे. समाजाला आरसा दाखवण्याचे काम ते करत आहेत. म्ह्णून त्याच्यावर जातीवाद्याकडून टीकाटिप्पनी सुद्धा होत आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात प्रत्यक्ष अमिताभ बच्चन कधी सहभागी झाले, किंवा नाही झाले. परंतु त्यांना देखील यां चित्रपटात बाबासाहेबांपुढे नतमस्तक व्हावे लागले. ही जादू फक्त नागराज मंजुळेच करू शकतात हे त्रिवार सत्य आहे. अभिनयाचा बादशाह, अमिताभ बच्चन महामानवाला अभिवादन करताना खूप आनंद वाटला. नागराज मंजुळे परीवर्तनवादी विचाराची शिदोरी घेऊन जेंव्हा कधी येतील तेंव्हा आंबेडकरवादी आपल्या पाठीशी असेल यात शंका नाही. सांगण्यासारख खूप आहे. परंतु प्रत्यक्ष पाहण्यातच खरी मजा आहे. आम्ही सहकुटुंबं हा सिनेमा बघितला आहे. आपणही सहकुटुंब हा सिनेमा बघून नागराज मंजूळे यांना साथ द्या. चित्रपटाचा आनंद घ्या जयभिम.
*रतनकुमार साळवे*
*औरंगाबाद,9923502320*