महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

महिलांचा सन्मान करणारा देश सदैव आघाडीवर असतो ...प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे

महिलांचा सन्मान करणारा देश सदैव आघाडीवर असतो ...प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे         

  आष्टी प्रतिनिधी                                          आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सोपानराव  निंबोरे म्हणाले की, राष्ट्र उभारणी मध्ये पुरुषांनी जसा हातभार लावला आहे.तसाच महिलांनी सुद्धा सिंहाचा वाटा उचलला आहे. अनेक देशभक्त महिलांच्या कर्तृत्वाचा आलेख आपण जेव्हा पाहतो,तेव्हा हे लक्षात येते की, स्त्रीने चूल आणि मूल याचाही संभाळ केला आणि वेळप्रसंगी युद्धातही उडी घेतली आहे.अंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध नात्यातून पाहताना तिच्या संघर्षाला सलाम केला पाहिजे.महिलांचा सन्मान करणारा देश सदैव आघाडीवर असतो.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केले.यावेळी कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,प्रा.शुभांगी खुडे,प्रा.मनीषा देवगुडे, प्रा.शोभा नरोटे,प्रा.रोहिणी कांबळे, प्रा.सोनवणे यांनीही औचित्याने विचार मांडले.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या हस्ते त्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.दत्तात्रय मुंढे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.शुभांगी खुडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.जे.एम.पठाण यांनी आभार मानले.