आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्याच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व स्वर्गीय रामचंद्र दादा धस यांच्या पत्नी आणि माजी मंत्री आ.सुरेश धस व माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास आबा धस यांच्या मातोश्री सुमन उर्फ अक्का रामचंद्र धस यांना 11 मार्च रोजी दुपारी दोन वाजता वयाच्या 79 व्या वर्षी देवाज्ञा झाली.त्यांच्यावर मूळगावी जामगाव तेथे रात्री नऊ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आष्टी, बीड जिल्हा,आणि पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता.याप्रसंगी मा.आ.भीमराव धोंडे, मा.आ.साहेबराव दरेकर,एडवोकेट चंद्रकांत आजबे,नंदकुमार मुंदडा,डॉ.भारतभूषण क्षीरसागर,सुशीला मोराळे,रमेशआडसकर, बलभीम सुंबरे यासह अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री धनंजय मुंडे, माजीआ.पंकजाताई मुंडे यांनी मोबाईल द्वारे श्रद्धासुमन अर्पण केले.वेळी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,पत्रकार उत्तम बोडखे, दत्ता काकडे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन,राधाकिसन पोकळे,राजेंद्र लाड,संतोष दाणी,सुखदेव पोकळे,शरद तळेकर,प्रा.आशोक भोगाडे,डॉ.सय्यद हुमायुद्दीन,प्रशांत काळे उपस्थित होते.
