निराधार जनतेसाठी कायम पाठीशी असल्यामुळे निराधारांच्या समस्या मार्गी लागत आहेत याचा खरा आनंद वाटतो! सुनील ठोसर
गेवराई - गेवराई तालुक्यातील हजारो निराधारांचे प्रश्न गेवराई प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे मागिल काही महिन्यांपासून प्रलंबित राहू लागले आहेत.यासाठी अनेक राजकीय नेते श्रेय घेण्यासाठी एक प्रकारे तालुक्यात चढाओड करु लागल्याचे दिसून येत आहे.हे प्रश्न मार्गी लागावे यासाठी मागिल अनेक दिवसांपासून आम्ही प्रशासन दरबारी अंदोलन,निवेदने देऊन मागणी करत आहोत.तर प्रजासत्ताक दिनी तालुक्यातील निराधारांच्या या मागणीसाठी आमच्या संघटनेच्या वतीने आत्मदहन करण्याचा इशारा देताच,गेवराई प्रशासन आता तालुक्यातील निराधारांचे प्रश्न हळू हळू निकाली काढू लागले आहेत. राज्यात व केंद्रात सत्ता आसलेले सत्ताधारी व विरोधक हे देखील पाठपुरावा या मागणीसाठी आपपल्या पध्दतीने करत आहे.परुंतू आमच्या जन अंदोलन,जनरेटा,निवेदने,अंदोलने व शेवटी आत्मदहन करण्याच्या इशारा देताच गेवराई प्रशासन तालुक्यातील निराधारांचे प्रश्न आता निकाली काढत आसल्याचे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी बोलताना सांगितले.
गेवराई तालुक्यातील निराधारांचे अनेक प्रश्न मागिल दोन तीन वर्षापासून प्रलंबित आहेत.सध्या या प्रश्नावर मागिल काही महिन्यांपासून तालुक्यात श्रेय घेण्यासाठी राजकीय पुढा-यांची एक प्रकारे चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.राज्यात व केंद्रात सत्तेत सत्ताधारी व विरोधी आसलेले तालुक्यातील राजकीय पक्षाचे पुढारी देखील निराधारांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपपल्या पध्दतीने शासन दरबारी प्रयत्न करत आहेत.माञ मागिल अनेक महिन्यांपासून या मागणीसाठी वारंवार शासन दरबारी निवेदने,अंदोलने व मागणी आम्ही करत असुन निराधारांचे प्रश्न सुटे पर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहे.सध्या गेवराई प्रशासनाकडून निराधारांचे प्रश्न निकाली निघू लागले आहेत.जनरेटा,जन अंदोलन,निवेदने,शासन दरबारी वेळोवेळी मागणी बरोबरच प्रजासत्ताक दिनी निराधारांसह या मागणीसाठी आमच्या संघटनेने आत्मदहन करण्याचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे.त्यामुळे गत आठवड्यापासून प्रशासन तालुक्यातील निराधारांचे प्रश्न निकाली काढू लागले आहेत.यामुळे तालुक्यातील वंचित आसलेल्या निराधारांमधे काहीशा या निर्णयामुळे आशा पल्लवित झाल्याचे दिसून येत आहे.दरम्यान सर्वच राजकीय नेत्यांनी आपपल्या पातळीवर राजकारण करावे,परूंतू निराधाराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकारण करु नये असे शासनाच्या अनुदानापासून वंचित आसलेल्या निराधारांमधून बोलले जात आहे.शासनाच्या अनुदानापासून वंचित आसलेल्या निराधारांनी देखील आपल्या फाईलचे आसलेले अपुरे कागदपञे तहसील कार्यालयात लवकरात लवकर जमा करणे आवश्यक आहे.आमच्या जनरेट्यामुळे व अंदोलनामुळे तालुक्यातील निराधारांचे प्रश्न मार्गी लागत आसल्याचे शेवटी बोलताना रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी सांगितले.
