सरकार माय बाप गरीबांच्या मुलांना शिकु दया शाळा बंद केल्याने मुलांचे लग्न होणार नाहीत,
सं अध्यक्ष प्रा.
मोहन ठाकर
सर्व काही सुरू फक्त शाळाच का बंद?
मुलांचं भविष्य अंधारात जाण्याआधी तरी जिल्ह्यातील शाळा सुरू करा?*गरिबांची मुले शिकू द्या वो ?
गेवराई प्रतिनिधी
महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात सध्या कोरोणाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे सध्या जिल्ह्यात शंभरीच्या आतच कोरोणा रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यातच राज्य सरकारने स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक मा. जिल्हाधिकारी साहेब यांना दिला आहे विद्यार्थीच्या जीवनातील शाळेतील एक एक दिवस विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो त्यातच गेली दीड वर्षा पासून शाळा बंद आहे दोन वर्षाच्या कालावधीत गेल्या महिन्यात पुन्हा एकदा शाळा महाविद्यालय सुरू झाले होते परत एकदा कोरोणा रुग्ण संख्या वाढत आहे म्हणून शासनाने शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता विद्यार्थ्यांना जीवनात काही हि करायचे असेल तर ते फक्त शिक्षणामुळेच साध्य होऊ शकते आणि हाच पहिला पर्याय आहे म्हणून जीवनातील मोठ्या अशाने आपल्या पाल्याला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो येथील भौगोलीक परिस्थिती पाहता निसर्गाचा असमतोल आणि अशीच वर्षानुवर्ष शाळा बंद राहीलया तर ही ओळख आणि परिस्थिती बदलणे अशक्य आहे. गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा पाहता व यामुळे पुन्हा एकदा ऊस तोड कामगार भविष्यात वाढू नयेत हीच अपेक्षा. सर्व काही सुरू आहे मात्र शाळा का बंद असा प्रश्न जिल्हावासीयांना पडतो आहे सध्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पहिली पासून शाळा सुरू झालेल्या आहेत पालघर-ठाणे. परभणी. सोलापूर. जालना. येथील कोरोना चे नियम पाळून शाळा सुरू झाल्या असून लवकरच नाशिक व पुण्यासारख्या ठिकाणी शाळा व महाविद्यालय बाबत सध्या अंतिम टप्प्यात आहेत सर्व राज्यात हॉटेलच्या वेळा वाढवल्या आहेत पर्यटन स्थळाला परवानगी मिळत आहे नंतर लग्नांना सुद्धा 200 लोकांना परवानगी देण्यात येत आहे सभा रॅली व कार्यक्रमांना परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे आता महाराष्ट्रातील कोरणा काय बीड जिल्ह्यातच आहे काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो आहे बीड जिल्ह्याच्या सर्व बाजूस जिल्हाया मध्ये स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे फक्त बीड जिल्ह्यातील शाळा बंद करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना काय साध्य करायचे आहे किंवा कोणाच्या सांगण्यावरून तर हे करत नाहीत ना हे समजायला तयार नाही जिल्हाधिकारी साहेब गरिबाचं लेकरू शिकू द्या ग्रामीण भागात आमच्या डोंगर पट्ट्यात रेंज नाही तर काही पालक ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात गेले आहेत त्यांच्या पाल्याकडे साहेब कोणत्या सुविधा आहेत त्यांच्यापाशी कोण बसून असणार आहे ऑनलाईन अभ्यास घ्यायला. आणि जरी सर्व काही असेल तर पालकांचा ऑनलाईन वर अविश्वास आहे. कोणी ऑनलाईन शिक्षण घ्यायला तयारच नाही पालकांची मानसिकता शिक्षणाबाबत संभ्रमात आहे तर सरकारी शाळा विद्यालय व कर्मचारी आपण आपल्या संसारात व्यस्त आणि नोकरीत सुस्त झाल्याचे चित्र सर्वत्र आहे मुले दररोज शेतातील कामे तर काहीजण मजुरीने जात आहेत याची जबाबदारी कोण घेणार शिक्षणाशिवाय सर्वसामान्यांच्या जीवनात कायापालट होऊ शकत नाही आणि नेमकं तेच जिल्हाधिकारी साहेब तुम्ही हिरावून घेतले आहे जिल्ह्यातील नेते शिक्षण सम्राट सामाजिक कार्यकर्ते याबाबत चकार शब्द काढायला तयार नाही शिक्षणाबाबतची ही उदासीनता भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल हे मात्र निश्चित. लवकरात लवकर बीड जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू कराव्यात ही हात जोडून सर्वसामान्य विद्यार्थी व पालका कडून अपेक्षा.
