प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या हस्ते कु.मोनिका पोकळे हिला सायकल भेट
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाची,इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी कु.मोनिका राजेंद्र पोकळे हीची सायकल महाविद्यालय पार्किंगमधून चोरीला गेली होती. तिला महाविद्यालय आणि सहयोग पतसंस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या हस्ते नवी सायकल भेट देण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे, डॉ. अभय शिंदे, कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन, बबन उकले,प्रा.जे.एम.पठाण,प्रा.ज्ञानेश्वर नवले, प्रा.रोहिणी कांबळे,प्रा.शुभांगी खुडे, प्रा.दादासाहेब साप्ते,प्रा.मनीषा देवगुडे, प्रा.शोभा नरोटे आदी उपस्थित होते.
