डॉ.बाबासाहेब मुटकुळे, डॉ.अभय शिंदे यांचे किशोर नाना हंबर्डे यांनी केलेअभिनंदन
आष्टी प्रतिनिधी
छत्रपती सेना,नाशिकच्या वतीने डॉ. बाबासाहेब मुटकुळे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तर डॉ.अभय शिंदे आणि त्यांचे सहकारी डॉ.नितीन बनकर, प्रा.विजय गव्हाणे, प्रा.छगन घुले, प्रा. वाल्मीक बन, प्रा.शुभांगी खुडे,आणि विशेष मार्गदर्शक नॅक समन्वयक प्रा.निवृत्ती नानवटे यांनी सहकार्य केलेल्या एन इकोफ्रेंडली डेवलप्ड इन्स्टिट्यूट साठी नाहीदा अब्दुल्ला यांना पुस्तक बांधणी साठी विशेष सहकार्य केल्याबद्दल आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांनी कौतुक केले आहे. यावेळी हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य अविनाश कंदले, कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव, प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.सदर पुस्तक लुधियाना पंजाबच्या रिगी पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.
