छत्रपती मल्टीस्टेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
चेअरमन,संतोष भंडारी राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित.
गेवराई प्रतिनिधी
अनेक तरूणांना रोजगार निर्मिती करत तसेच कित्येकांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने बॅकींग सेवा पुरवणा-या छत्रपती मल्टीस्टेट या संस्थेचा नावलौकीक सर्वत्र आहेच पण नुकताच या संस्थेला "शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे" बहुउदेशिय संस्था नाशिक यांच्याकडून राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार संस्थेचे चेअरमन संतोष भंडारी यांना सहपत्नीक देण्यात आला.छत्रपती संभाजीराजे बहुउदेशिय संस्था या पुरस्काराचे आयोजन दरवर्षी करत असते.मागील वर्षी हा पुरस्कार सोहळा अहमदनगर येथे संपन्न झाला होता.या वर्षी जळगाव येथे संपन्न झाला.महाराष्ट्रातील उल्लेखनिय कार्य करणा-या पाच महिला व पाच पुरूष यांची निवड केली जाते.ज्यांच्या कर्तुत्वाची समाजमनावर छाप पडलेली आहे.अशा कर्तुत्ववान लोकांचा सर्व्हे करून या पुरस्कारासाठी निवड केली जाते.या वर्षी या पुरस्कारासाठी छत्रपती मल्टीस्टेट चे चेअरमन,उद्योजक संतोष भंडारी यांची निवड करण्यात आली.त्यानुसार दि.26 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर जळगांव येथे सकाळी 11.00 वाजता सुप्रसिध्द साहित्यिक डाॅ.अशोक राणा साहेब यांच्या शुभहस्ते तसेच जळगावच्या महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन,गुलाबराव देवकर साहेब(अध्यक्ष,जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅक,माजी पालकमंत्री जळगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोष भंडारी यांना सहपत्नीक या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.या पुरस्कास उत्तर देतांना संतोष भंडारी यांनी सांगितले की,विविध संस्थेकडून दिले जाणारे पुरस्कार हे आपली कार्यक्षमता वाढविण्यास मदत करत असतात.पुरस्कारासोबत जबाबदारी ही वाढत जाते.या राजस्तरीय पुरस्काराने मला खूप पोत्साहन मिळाले भविष्यात अजूनही खूप काम करायचं आहे भविष्यात छत्रपती मल्टीस्टेटच्या 100 शाखा स्थापन करून रोजगार निर्मिती करणे,छोट्या व्यावसायिकांना अर्थ साह्य देऊन आर्थिक पाठबळ देणे. हे छत्रपती मल्टीस्टेटचे मुख्य उदिष्ट असेल.असे मत संतोष भंडारी यांनी यावेळी व्यक्त केले.छत्रपती मल्टीस्टेट व चेअरमन संतोष भंडारी यांना आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष विकास भदाणे साहेब, जगन्नाथ महादेव पाटील,या सह कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.या पुरस्काराने संतोष भंडारी व छत्रपती मल्टीस्टेटवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
