विजय साळवे यांच्या वाढदिवसा निमित्य द रिअल पॅन्थर पूरस्कार वितरण सोहळा संपन्न
आपसातील मतभेद विसरून अन्याय अत्याच्यारा विरुद्ध एकत्र या - विजय साळवे
माजलगांव : अमर साळवे
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहरातील व्यंकटेश हॉल येथे बीड जिल्ह्यातील भारतीय दलित पॅन्थर मध्ये आपले योगदान देणाऱ्या भिमविरांना द रिअल पॅन्थर नावाचा पूरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी दलित नेत्यांनी आपसातील मतभेद विसरूण समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याच्यारा विरूद्ध एकत्र यावे असे आव्हाण स्वारिप चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांनी आपल्या अधिक्षिय भाषणात केले.
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील गोर - गरीब, दलित - पिडित जनतेवर अन्याय ,अत्याचार होत होते मनाला सुन्न करणाऱ्या घटना घडत होत्या. याला रोखण्यासाठी एक संघटना निर्माण झाली.खरे लढणारे पँथर उदयास आले ते म्हणजे नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ठाले यांच्या कार्याचा आदर्श घेवून घरा-घरात पॅन्थर तयार झाले होते.
बीड जिल्ह्यातील तत्कालीन पॅन्थर्सना द रिअल पॅन्थर पूरस्काराने सन्मानित करण्याचा मानस स्वारिपचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवला होता.
दलित पॅन्थर चे एस.एन. डोंगरे , दयानंद स्वामी , भास्कर रोडे ,संदिपान हजारे, किशोर गायसमुद्रे ,नवनाथ धाईजे याचा द रियल पॅन्थर या पुरस्काराने स्वारीपच्या वतीने माजलगाव येथील व्यंकटेश हॉल येथे त्यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वारिप चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मा.विजय दादा साळवे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिनगारे ,मराठवाडा उपाध्यक्ष वसंत वावळकर, जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब राऊत ,जिल्हा प्रवक्ता आंजेराम घनघाव ,जिल्हा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी अॅड.अमोल डोंगरे ,जिल्हाध्यक्ष मानवी हक्क अभियान राजेश घोडे ,योगेश गायकवाड, विलास जावळे , अविनाश बनसोडे ,सुशांत पोळ नगरसेवक विकास खंडाळे शिवाजी सुतार ,बाबा टाकणकार, सुशिल शिंदे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राम भोले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वारिप चे ॲड. नंदकिशोर खळगे, पंडित ओव्हाळ, वचिष्ठ लांडगे, विशाल साळवे, राहुल सिरसट, विजय घनघाव,अजय साळवे, रमेश बल्लाळ, विशाल पायके, बंटी इंगळे , केशव सातपूते, ब्रम्हानंद वाघमारे,इत्यादींनी परिश्रम घेतले.
