माजलगावात 9 लाखाचा गुटखा पोलिसांनी सापळा रचून पकडला.
स.पो अ. कुमावत यांच्या विशेष पथकाची कारवाई.
माजलगाव : अमर साळवे
मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे माजलगावात 9 लाख 22 हजाराचा गुटखा पोलिसांनी सापळा रचून पकडला.सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई केली आहे.यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या 5 आरोपींना सिने स्टाइल पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सहायक पोलिस अधीक्षक कुमावत यांना माजलगावात दोन युवक गुटखा घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली.यावरून कुमावत यांनी आपल्या विशेष पथकाला गुरुवार दि.3 रोजी सकाळी सहा वाजता केज वरून माजलगाव येथे पाठवले.यावेळी पोलिसांनी शहरा आझाद चौकातील बायपास रोडवर सापळा रचला.यावेळी स्कार्पिओ क्रमांक एम एच 20,सि.एच 3199 गाडी थांबली.त्या गाडीजवळ स्विफ्ट गाडी क्र.mh14,fc2923 येऊन थाम्बली.त्यावेळी दोन्ही गाडितुन 5 लोक खाली उतरनले.स्कार्पिओ गाडीतील गुटखा स्वीफ्ट गाडित टाकत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी दोघं पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली.परंतु त्यांचाही सिने स्टाइल पाठलाग करत पोलिसांना त्यांना जेरबंद केले.या कारवाईत पोलिसांना राज निवास कंपनीचा 32 बोऱ्या सुगंधित मसाला गुटखा मिळाला ज्याची किंमत 1लाख60 हजार,जाफरानी जर्दा पुडे की.40 हजार,स्कार्पियो जूनी किं.3 लाख,स्फिफ्ट गाडी जूनी कीमत 3 लाख रुपये, व जप्त केलेल्या मोबाईलची रक्कम धरून पोलिसांनी या कार्यवाहित 9 लाख 22 हजारचा मुद्देमाल ताब्यात घेतला.दरम्यान त्रिंबक आनंत डुकरे, ज्ञानेश्वर बाबासाहेब होंडे, सचिन गोरख सुरवसे, बाबासाहेब सुभाष वरेकर, व अशोक धोंडीराम वर्पे विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी शेषराव दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.या कार्यवाहित पो.ना. बांगर,पो.ना.भडाने,पो.ना.वंजारे,पोना.अहंकारे यांचा सहभाग होता.
