पुरोगामी पत्रकार संघाच्या तालूकाध्यक्ष पदी अमर साळवे तर सचिव पदी राजरतन डोंगरे यांची निवड
माजलगाव । प्रतिनिधी
पुरोगामी महाराष्ट्रात अनेक संत महंत, महात्मे होऊन गेले. त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा ठसा या महाराष्ट्रात उमटवला आहे .
या पार्श्वभूमीवर याच महाराष्ट्रात पुरोगामी पत्रकार संघाची स्थापना झाली. बहूजन विचारवादी मत असलेल्या , तळागाळातील नागरिकांच्या व पत्रकारांना स्थानिक पातळीवर काम करत असतांना येणाऱ्या अडी अडचणी सोडवण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ स्थापित करण्यात आला.
याच अनुषंगाने माजलगाव येथील शासकीय विश्राम ग्रह येथे झालेल्या बैठकीत माजलगाव तालुक्याची पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणी मराठवाडा उपाध्यक्ष सुहास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष म्हणून अमर साळवे तर तालूका सचिव म्हणून राजरतन डोंगरे , व उपाध्यक्ष म्हणून सचिन नाईक यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.
तालुक्यातील पत्रकारांना वार्तांकन करत असतांना येणाऱ्या अडचणी व समस्या दूर करण्यासाठी व पत्रकारांच्या सदैव पाठिशी खंबीरपणे उभे राहून व प्रश्न सोडवण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ सदैव तत्पर राहून काम करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मागे खंबीरपणे उभी राहीलं. या पुरोगामी पत्रकार संघाच्या माजलगाव तालुक्याची कार्यकारणी पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष म्हणून अमर साळवे, तालुका उपाध्यक्ष सचिन नाईक, तालुका सचिव राजरतन डोंगरे, तालुका मार्गदर्शक व सल्लागार म्हणून जेष्ठ पत्रकार सय्यद समद , कार्याध्यक्ष म्हणून दर्शन डोंगरे, संपर्क प्रमुख म्हणून दिपक चांदमारे संघटक म्हणून राम कटारे तर सदस्य म्हणून कृष्णा सरवदे, पांडूरंग ईदगे यांची सर्वांनुमते पुरोगामी पत्रकार संघात निवड करण्यात आली आहे...
