मुलगी पाहायला गेले आणि लग्न लावून आले
(पवळे .वखरे कुटुंबाचा एक आदर्श विवाह संपन्न)
गेवराई प्रतिनिधी
गेवराई मादळमोही येथे आज दिनांक 21 फेब्रुवारी 2022 वार सोमवार गेवराई येथील श्री बाबुराव पवळे व सौ पवळे वर मुलगा प्रीतम बाबुराव पवळे व सुनील पोपळे अंबादासराव पवळे किसनराव खजिनदार इतर हे मादळमोही येथील गोवर्धन वखरे यांची मुलगी कोमल हिस पाहण्यासाठी गेले आणि दोन तासात विवाहाची तयारी व विवाह संपन्न यालाच गेट किन विवाह म्हणायचे विवाह जुळवून आणण्यासाठी पाहुणेमंडळी यांचा महत्वाचा वाटा ठरला झाले असे की श्री बाबुराव पवळे हे गेवराई येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा प्रीतम हे गढीयेथील जय भवानी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत खरे म्हणजे शिक्षण संस्थेचा सामाजिक विचारसरणीचा पाया त्यांच्यामध्ये बिंबवल्या मुळे त्यांनी वधूकडील मंडळीला सांगितले की माझा विवाह अगदी साध्या पद्धतीने करावा हा शुभ विवाह अतिशय साध्या पद्धतीने दोन तासात विवाह ची तयारी एक आदर्श विवाह म्हणून संपन्न झाला खरे म्हणजे पवळे कुटुंबाचे आणि वखरे कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे कमीच खरोखर हे कुटुंब अभिनंदनास पात्र आहे या विवाह प्रसंगी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गेवराई येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे शिक्षक कॅप्टन शंकर राव सूर्यवंशी सर जय भवानी शिक्षण संस्थेतील शिक्षक श्री गणेश राव आतकरे मादळमोही येथील सरपंच श्री राजेंद्र राव वारंगे जिल्हा परिषद बीड चे सभापती श्रीमान तळेकर माजी सभापती श्रीमान पंढरीनाथ लगड बापू उपसरपंच श्री पठाण मादळमोही ग्रामपंचायत सदस्य श्री सुभाष राव श्री वाघमारे सुनील पोपळे बाबासाहेब वाघमारे.जय भवानी शिक्षण संस्थेतील शिक्षक ग्रामस्थ डॉक्टर्स प्रतिष्ठित व्यापारी व नागरिक महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी वधू वरास शुभ आशीर्वाद दिले या विवाह प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पवळे व वखरे परिवारातील पाहुणेमंडळी उपस्थित होते या दोन्ही परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
