शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले
गेवराई (प्रतिनिधी)चित्रकला पूर्ण जगाला जागृत करते, अन्य सर्व कलांमध्ये चित्रकला ही श्रेष्ठ मानली जाते. मोठमोठ्या चित्रकलेला श्रेष्ठ म्हटले आहे
मयुरी दायमा या विद्यार्थिनीने शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र पेन्सिल च्या साहाय्याने रेखाटले असून या रंगकलेवर खूप मेहनत तिने घेतली आहे मयुरी चित्र काढण्यास खूप माहीर असते विशेष म्हणजे कलर चित्रकला पेंटिंग, चित्रकला ड्रॉईंग, सोपी चित्रकला, यासारख्या अनेक चित्रकला काढून दाखवतात कलेच्या स्पर्धेत सहभागी असतात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटणे कौतुकास्पद बाब आहे
चौकट प्रतिक्रिया
मी माझ्या वहीत अनेक विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र माझे आवडते चित्र आहे. या माध्यमातून मला शिवछत्रपती शिवाजी महाराज, विविध फळांचे, देव दैवतांची, मोर, पक्षी, प्राणी यांचे चित्र काढायला आवडतात. माझी आई मला जास्तीत जास्त चित्र काढायला प्रोत्साहन देते. माझ्या शाळेत देखील प्रत्येकाला माझे चित्र आवडते. जेव्हा केव्हा शाळेत चित्रकला स्पर्धा असते. तेव्हा मला त्यात सहभाग घेऊन चित्र काढणे खूप आवडते. मी पण मोठ्या आनंदाने चित्रकला स्पर्धेत भाग घेते. माझ्या आजोबांनी मला घरात एक लहान खोली चित्रकला करण्यासाठी करून दिली आहे. त्या खोलीत मी माझे सर्व चित्र ठेवले आहेत तसेच चित्रकार मयुरी दायमा यांनी सांगितले
