हंबर्डे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात प्रतिवर्षा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.रवी सातभाई यांनी केले. प्रा.डॉ.सखाराम वांढरे यांचे यावेळी
व्याख्यान संपन्न झाले.प्रा.डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,प्रा.ज्ञानेश्वर नवले यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे,प्रा महेश चौरे उपस्थित होते.प्रा.डॉ.सुहास गोपने यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.जे.एम.पठाण यांनी आभार मानले.
