आष्टी प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर आष्टी येथील,लिक्विड मेडिकल ऑक्सीजन प्लांट आणि ऑक्सिजन जनरेशन प्लांट चे उद्घाटन ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.साहेबराव दरेकर,जिल्हा शल्य चिकित्सा डॉ.साबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून अण्णा चौधरी,सतीश आबा शिंदे,किशोर नाना हंबर्डे,शिवाजी राऊत उपस्थित होते.आ.बाळासाहेब आजबे यांच्या निधीतून एक अंबुलन्स ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आली.त्याचे मंत्री महोदयांच्या हस्ते नारळ फोडून,फीत कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे यांनी प्रसुतीच प्रमाण वाढल्यामुळे डॉ.किशोर भोसले,डॉ.रामदास मोराळे यांचे कौतुक केले.तसेच आयुष्य विभागाचे हर्बल गार्डन,आयुष ओ.पी.डी. चे काम पाहून डॉ.संतोष जावळे आणि डॉ.इम्राना मॅडम यांचे कौतुक केले. आंतररुग्ण विभागाचे उत्तम काम पाहून इन्चार्ज सिस्टर बी.शेख सह सर्व स्टाफ चे कौतुक केले. जन्म,मृत्यु विवाह नोंदणीचे उत्कृष्ट काम पाहून संदीप धस यांच्या कामाची प्रशंसा केली.प्रयोगशाळा विभागाचे गलांडे,जयचंद नेलवांडे आणि पवार मॅडम यांच्या कामाची विशेष दखल घेतली.औषध विभागाच्या श्रीमती झुंजारे,अश्विनी,रजनिश कांबळे,सुषमा कोठुळे यांचे कौतुक केले. ग्रामीण रुग्णालय तथा ट्रामा केअर सेंटरच्या एकूणच उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ.साबळे यांनी डॉ.राहुल टेकाडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
