महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न
वैजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची राज्य मध्यवर्ती कार्यकारिणी राज्य स्तरीय बैठक तसेच हुतात्मा भाई कोतवाल स्मृतीदिनानिमीत्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शहरातील पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहांमध्ये रविवार ता २ रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांच्या अध्यक्षतेखाली .आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी पंचायत समिती सभापती सिमा मिसाळ उपसभापती योगीता निकम
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बारा बलुतेदारांची परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्था आहे पारंपरिक व्यवसाय आधुनिकीकरण झाल्याने ते आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तरी बलुतेदारांनी व्यवसायावर अवलंबून न राहता शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजवावी तसेच ओबीसी समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन आपले प्रश्न शासन दरबारी मांडुन मार्गी लावुन घ्यावे समाजातील तरुण मंडळींनी राजकारणात प्रवेश घेऊन समाजाची प्रगती करावी शिक्षण संघटना व संघर्ष याचा अवलंब करावा. तसेच गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी विशेष प्रयत्न करेल असे जात पात न करता केन्द्रीय जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे म्हणून ओबीसी आरक्षणासाठी एकत्रितपणे लढा दिला पाहिजे असे संबोधले. तर राजा राजपुरकर यांनी काळासोबत विचार बदला केशशिल्पी महामंडळाची महाराष्ट्रात स्थापना झालीच पाहिजे जेणेकरून समाजासाठी आर्थिकदृष्ट्या सबलीकरणासाठी फायदेशीर ठरेल तसेच समाजाने कुटुंब नियोजनाचा अवलंब करावा प्रगतशील व्यवसाय करावा समाजात एकजुट कायम राहिली नाही तर समाज प्रगती पासुन वंचित राहावे लागेल तद्नंतर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर उजाळा देत जिल्ह्यातील ठिकाणी समाज मंदिर स्थापना व्हायला पाहिजे असे संबोधले तर सयाजी झुंजार म्हणाले की ओबीसी समाजाला आरक्षणाबाबत कोणत्या पक्षाला दोष द्यावा हे अजुन समजलेच नाही आरक्षण संपवणे हाच सरकारचा मोठा प्रयत्न आहे जातीनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकारला ओबीसी चे महत्त्वच कळणार नाही जातीत एकी नाही म्हणूनच सर्व मागे आहे केशशिल्पी महामंडळ दोनच महीन्यात बरखास्त केले हे सर्वात मोठे दुर्दैव आहे त्यामुळे समाजातील तरुणांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे तरुणांमध्ये महापुरुषांचे जागे झाले पाहिजे ओबीसी आरक्षण टिकले तरच आपण टिकु असे आवाहन महाराष्ट्रातुन आलेल्या राज्यस्तरीय पदाधिकार्याना अवाहन केले. यावेळी व्यासपीठावर प्रदेश कोषाध्यक्ष घनश्याम वाघ, चिटणीस दिलीप अनर्थे ,एम आर टिपुगडे,सुनील पोपळे,रामदास पवार,सुधिर राऊत,प्रविण सावरकर, अशोक सुर्यवंशी,सोमनाथ सांळुके, विष्णु वखरे,शाम आस्करकर,सतिष मानकर, मारोती टिपुगडे,विकास मदने, महेश सांगळे,व प्रियांका जाधव आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश तोडकर, अमित अनर्थे, संदिप विश्वासराव, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब जगताप,सुधाकर आहेर यांनी केले तर आभार विष्णु वखरे,विभागीय अध्यक्ष यांनी मानले. कार्यक्रमाला विश्वनाथ बोराडे, प्रेम राजपुत,संजय सुर्यवंशी, आदींसह महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते
