माजी उपनगराध्यक्ष आजमखाॅ पठाण याचे निधन
गेवराई (प्रतिनिधी ) गेवराई शहराचे माजी उपनगराध्यक्ष आजमखॉ पठाण याचं निधन झाले आहे. निधनाची वार्ता समजताच,आज सामान्यांसाठी झगडणारा मित्र गमावल्याची भावना शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केली.
आजमखान पठाण हे गेल्या अनेक दिवसांपासुन ते आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सरू होते, मात्र दि 30 डिसेंबर, गुरूवार रोजी पहाटे त्यांची प्राणजोत मालवली. मृत्युसमई ते 60 वर्षाचे होते. शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या खांद्याला खांदा लावून ते सक्रियपणे राजकारणात काम करत होते. कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. काम घेऊन आलेल्या प्रत्येक गोरगरीब माणसाच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचे काम आजमखान पठाण यांनी सातत्याने केले. तहसील कार्यालय आणि ग्रामीण भागातला सामान्य माणूस यांच्यातील दुवा म्हणून ते काम करत होते. गेवराई शहरात त्याचां चांगला जनसंपर्क होता. त्याच्यां निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आपला सच्चा मित्र गेला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आजमखान पठाण यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केली. आजमखान पठाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , दोन मुली , असा परिवार आहे. त्याच्यां दु:खात दै महाभारत व सा.प्रकाश आधार परिवार सहभागी आहे.
