कोरोना मुळे म्रुत्यु झालेल्या मयताच्या कुटुंबियांनी मदतीसाठी त्वरीत फाँर्म भरावेत----अँड. निकम
----------------------------------------
गेवराई : बीड जिल्ह्यात कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. अनेक परीवारातील कर्ते व्यक्ती मयत झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडले आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने अशा परीवाराला पन्नास हजार रुपयांची मदत देण्यास सुरुवात केली आहे. त्याकरिता आँनलाईन फाँर्म भरणे आवश्यक आहे. मयतव्यक्तीचे आधार कार्ड, दवाखान्यातील रिपोर्ट, म्रुत्यु प्रमाणपत्र, अर्जदाराचे आधार कार्ड, बँक पासबुक किंवा चेक,इ. कागदपत्रांद्वारे आँनलाईन फाँर्म भरावा व संपूर्ण अर्ज भरल्याची व अर्ज प्रलंबित न राहता तो दाखल झाल्याची खात्री करून पावती घ्यावी. प्रलंबित असा शेरा आल्यास अर्ज दाखल झाला नाही असे समजून संपूर्ण माहितीची पूर्तता करावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे जावून कागदपत्रांसह फाँर्म भरावा. किंवा या अनुषंगाने काही अडचण आल्यास कोरोना ग्रस्त परीवारातील एकल महिलांसाठी राज्यभर कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री. हेरंब कुलकर्णी, निमंत्रक, महाराष्ट्र शासन यांच्या वात्सल्य समीतीशी संपर्क साधावा असे आवाहन वात्सल्य समीतीचे गेवराई तालुका समन्वयक अँड. सुभाष निकम यांनी केले आहे.
