जिवनदिप अर्बन बँक ग्राहकांशी विश्वासपात्र ठरेल:-ह.भ.प. श्री दिलीप बाबा घोगे
शुभम घोडके [गेवराई]
संत महंत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जीवनदिप अर्बन मल्टीपर्पज निधी लि.चा शुभारंभ संपन्न
गेवराई ( प्रतिनिधी)गेवराई तालुक्याचे वैभव आर्थिक दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे गरजवंतांना निश्चितपणे कर्ज देण्याचे काम जीवनदिप अर्बन मल्टीपर्पज निधी लि.या बँकेच्या माध्यमातून प्रामाणिक पणे करेल. आर्थिक व्यवहार मोबाईल अॅपने,नेटबॅकींग सेवा देण्यासाठी जिवनदिप अर्बन बँक परिवार प्रयत्नशील राहिलं व चांगल्या करिअरमध्ये यशाचं शिखर गाठण्यासाठी चेअरमन नितेश पवार यांच्या सह कर्मचारी वृंद यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावलेली आहे विशेष ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या क्षेत्रातला अनुभव व विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचे व गरजेचं कारण अनुभव व विश्वास हा भविष्यातील करिअरचा सर्वस्व असतो येणाऱ्या ग्राहकांला चांगली सर्विस देणं हे खुप महत्वाचे आहे व मेहनत घेतल्यास यश नक्कीच मिळेल या शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती दिलीप (बाबा) घोगे यांनी केले असून यांच्या शुभहस्ते या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अमरसिंहजी पंडित, श्री.सुनिल मंडले सर (शाखाप्रबंधक) श्री. रमेशजी खाडे (उद्योजक औरंगाबाद)
श्री.नागरे साहेब (भवानीबँक,मॅनेजर) श्री. पापाजी मोटे , अॅड श्री.पाटील सर, श्री.भारतराव पंडित , श्री.संदिप काळे सर, श्री.दिपक गिरे, श्री.शुभम पानखडे, श्री. कोंडीराम चोरमले
श्री.बंडू पवार , श्री.ओंकार पवार, श्री.शंकर पवार, श्री.साहेबराव पांढरे श्री.सतिष चव्हाण( सरपंच )
श्री.डाॅ.जिवन राठोड ,.श्री.शुभम काळे(सी.ए), युवा पत्रकार श्री.दत्ता वाघमारे, श्री.गजानन चौकटे, श्री भागवत जाधव, श्री.शुभम घोडके, श्री.विठ्ठल राठोड, श्री.किशोर राठोड , श्री.संदीप राठोड, श्री.राखा शेठ, श्री. बाबुराव रामधन पवार , श्री.व्हि.के.कुलकर्णी, श्री.अनिल धोंडरे,रिपाइं ता. प्रमुख .किशोर कांडेकर, श्री.बालाजी पवार , श्री.रवि राठोड , श्री.राहुल आळणे, श्री. सतिष पवार, श्री.संदेश पवार यांच्यासह, ज्येष्ठ नागरिक,वकील डॉक्टर, व्यापारी व सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रोहन राठोड यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.भगवान ढेंबरे यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य सन्माननीय सर्व कर्मचारी वृंद, पिग्मी प्रतिनिधी यांनी केले याप्रसंगी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
