महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

शहरची सात सुवर्ण पटकावत राज्य किकबॉक्सिंग स्पर्धेत विजयी घौडदौड

 शहरची सात सुवर्ण पटकावत राज्य किकबॉक्सिंग स्पर्धेत  विजयी घौडदौड 

मुंबई : ऑल महाराष्ट्र राज्य  कॅडेट आणि ज्युनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१, आमदार चषक २०२१  किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच सुपा-अहमदनगर येथे पार पडली.  मुंबई शहरातील किक बॉक्सर खेळाडूंनी आपली चमक दाखवत ७ सुवर्ण पदके, ७ रौप्य पदके व १२ कांस्य पदके अशी एकूण २६ पदके पटकावत चमकदार कामगिरी केली. स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या संस्थेचे अध्यक्ष उमेश ग. मुरकर यांनी मुंबई शहर चे संघ प्रशिक्षक म्हणून कामगिरी पार पाडली. आमदार नीलेश लंके हे प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेला उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्गाटनच्या वेळी खेळाडूंना प्रेरक शब्दांनी व मार्गदर्शनाने खेळाडूंमध्ये त्यांच्या भावी क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. नीलेश शेलार (वाको महाराष्ट्र अध्यक्ष) श्री.धीरज वाघमारे सर (वाको महाराष्ट्र सचिव), राजेश्वरी कोठावळे (आयोजक) व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. सदर स्पर्धेस महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांनी सहभाग नोंदवत एकूण  ९३० मुले व मुलींनी उपस्थिती नोंदविली. मुंबईच्या  विघ्नेश मुरकर याला सदर राज्य स्पर्धेत  बेस्ट रेफेरी पुरस्काराने सन्मानित केले गेले, विघ्नेशने २०१९ साली तिसऱ्या इंटरनॅशनल वाको किक बॉक्सिंगचे जज आणि रेफरिंग सेमिनार मध्ये सहभाग घेऊन  तो आंतरराष्ट्रीय रेफरी कमिशन, रिंग स्पोर्ट्सचे अध्यक्ष युरी लखिकोव्ह आणि ततामी  स्पोट्र्सचे अध्यक्ष ब्रायन ब्रेक यांच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षित झाला आहे. मुंबई विभागातून विघ्नेश वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  
मुंबई शहरचे विजयी स्पर्धक -  सुवर्ण पदक : मुले- विन्स पाटील ( पॉईंट फाईट ), समर्थ सावंत (किक लाईट), तेजस व्हटकर (लाईट कॉन्टॅक्ट), मुली -  फातिमा  तुझ कागलवाला ( किक लाईट), सारा कागलवाला ( फुल कॉन्टॅक्ट), झैनाब बारोट (लाईट कॉन्टॅक्ट), रेवा सक्सेना (लाईट कॉन्टॅक्ट), 
रौप्य पदक : मुले- आदि पिसोळकर (किक लाईट), सावीर पालये ( पॉईंट फाईट ), आलिअसगर सुटेरवाला (लाईट कॉन्टॅक्ट), असद अत्तारी (लाईट कॉन्टॅक्ट),  आयमान मक्कानी  (लाईट कॉन्टॅक्ट),  मुली - रेवा सक्सेना  (किक लाईट),  कांस्य पदक : मुले - साईराज पासी  (लाईट कॉन्टॅक्ट),  आलोक ब्रिद    (लाईट कॉन्टॅक्ट), आलिअसगर सुटेरवाला  (किक लाईट), विन्स पाटील(लाईट कॉन्टॅक्ट), आदि पोसोलकर (लाईट कॉन्टॅक्ट), दाऊद वागलावाला (किक लाईट), आदिल कागलवाला(लाईट कॉन्टॅक्ट),  मुली- फातिमा तुझ कागलवाला (लाईट कॉन्टॅक्ट),रेवा सक्सेना (मुसिकल फॉर्म)
सहभाग : प्रज्ञेश पटवर्धन, आशिष महाडिक