महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

अफवांवर विश्वास न ठेवता जातीय सलोखा कायम ठेवा - उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी केले आवाहन

अफवांवर विश्वास न ठेवता जातीय सलोखा कायम ठेवा  - उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी केले आवाहन 


गेवराई  प्रतिनिधी

त्रिपुरा येथील घटनेने आपल्या राज्यात ठीक ठिकाणी आंदोलना दरम्यान काही ठिकाणी जातीय तणाव निर्माण होऊन अप्रिय घटना घडल्या,  त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आपल्या तालुक्यात ही अशा प्रकारे अफवा पसरवण्याचा प्रयत्न कोणी केला. त्या अफवावर विश्वास न ठेवता तालुक्यात काही अप्रिय घटना घडू नये, म्हणून सर्व समाजातील लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहान गेवराई उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.


राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन झाल्याने कायदा अन सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गेवराईचे पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी उपविभागीय कार्यालयात शहरातील शांतता समितीची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, नागरिकांनी सतर्कता  बाळगणे गरजेचे आहे. गेवराई तालुक्यातील नागरिकांनी संयम बाळगावा, कोणतेही जाती,धर्म बाबत तिढा निर्माण करणारे मेसेज करू नयेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा पोलीस उप अधीक्षक राठोड यांनी दिला आहे .

या वेळी शांतता समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्वांनी शांतता ठेवावी. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्यातून कुठल्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करू नये.कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये.सोशल मीडिया, व्हाट्सअप इतर माध्यमातून कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये. कोणत्याही प्रकारचा अफवा पसरविणारा, सामाजिक तेढ निर्माण करणारा व्हिडिओ, मेसेज, फोटो व्हायरल करू नये, असे करताना कोणीही दिसून आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा देवून ते म्हणाले की बीड पोलिसांची जिल्ह्यातील सोशल मीडिया आणि इतर समाजकंटकांवर करडी नजर आहे.तरी आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारे जातीय, सामाजिक तेढ निर्माण होण्याची संधी कोणालाही देऊ नये,बंधुभावाची,सलोख्याची,

मानवतेची वागणूक ठेवावी असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी मुफ्ती मौलाना मोईनोदीन कासमी,मुफ्ती गयाजोदिन, मौलाना शब्बीर साहेब,ज्येष्ठ मार्गदर्शक अन्सारी, पत्रकार सुभाष सुतार, यांचे सामाजिक एक्ये कायम राहावे या बाबत त्यांनी विचार मांडले, सर्व प्रमुख लोकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. या वेळी पोलीस निरीक्षक पेलगुलवार साहययक पोलीस निरीक्षक संदीप काळे,नवघरे, नवले व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.