तुळजापूर ते गेवराई पायी ज्योत दिंडी
शुभम घोडके/ गेवराई
गेवराई (प्रतिनिधी) शहरातील सावता नगर येथील श्री. सावता दुर्गा उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दुर्गा उत्सव निमित्त तुळजापूर ते गेवराई पायी ज्योत दिंडी आणण्यात येणार आहे यासाठी येथील तरुण मंगळवार रोजी रवाना झाले आहेत
शहरातील सावता नगर भागातील श्री. सावता दुर्गा उत्सव समितीच्या वतीने 5 वर्षापासून सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यां श्री. सावता दुर्गा उत्सव समितीच्या वतीने तुळजापूर ते गेवराई पायी ज्योत दिंडी आयोजित केले आहे. ज्योत आणण्यासाठी मंगळवार रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता येथिल तरुण गेवराई हुन पायी ज्योत दिंडी आणण्यासाठी तुळजापूरकडे रवाना झाले आहेत
उत्सव समितीच्या माध्यमातून याहीवर्षी नवरात्रीच्या काळात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे समिती कडुन सांगण्यात आले आहे पायी ज्योत दिंडी घटस्थापनेच्या दिवशी गुरुवारी गेवराईत दाखल होणार आहे.
