चालक दिनानिमित्त मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांनी चालकांना केले सन्मानित
चालक हे आपल्या देशाचे खरे चालक - मिठ्ठू आंधळे
गेवराई प्रतिनिधी -
नुकताच महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त यांनी प्रथमच चालक दिन घोषित केला होता. आजपर्यंत एकदाही चालक दिन घोषित केला नव्हता. देशातील सर्व प्रकारचे चालक हे आपल्या देशाचे खर्या अर्थाने चालक आहेत. आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. सर्व चालकांचा सन्मान म्हणून मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांनी गेवराई बसस्थानकावर अनेक चालकांना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त यांनी १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी चालकांना गौरविण्यात आले आहे. जर चालक संपावर गेले तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था नक्कीच थांबल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी नक्कीच या व्यवस्थेचा मुख्य कणा असणाऱ्या घटकाला नियमितपणे सर्वांनी मानसन्मान दिला पाहिजे. एसटी चालक, बेस्ट चालक, ट्रक चालक, देशसेवेतील विविध चालक, तसेच इतर सर्व खाजगी, विविध परिवहन सेवेतील चालक तसेच देशाच्या दळणवळण व्यवस्थेमध्ये आपली अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या सर्वांचा सन्मान होणे आवश्यक आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने चालकांना त्यांच्या कामा प्रमाणे मोबदला, मानसन्मान मिळत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
देशाच्या व्यवस्थेमध्ये जे खर्या अर्थाने देशाचे चालक आहेत. त्याप्रमाणे त्यांचा सन्मान होत नाही. जोपर्यंत ही व्यवस्था या मुख्य घटकांकडे दुर्लक्ष करत आहे, तोपर्यंत हा मुख्य वर्ग असाच राहतोय की काय असेच दिसत आहे.
यावेळी उपस्थित सर्वांनी सर्व चालकांना शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर चातुर, वाहक नाटकर, जाधव, दादासाहेब गर्जे तसेच गेवराई आगाराचे विविध कर्मचारी उपस्थित होते.
