डेपो मॅनेजर अडकला जाळ्यात
30 हजाराची मागीतली "लाच"
गेवराई दि. 26 : प्रतिनिधी: येथील आगार व्यवस्थापक वाघदरीकर यास पंधरा हजार रुपयांची लाच घेताना चतुर्भुज झाला असून, ही कारवाई मंगळवार ता. 26 रोजी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. घटनेने खळबळ उडाली आहे. दोनच दिवसापूर्वी तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या विरूद्ध कारवाई झाली होती. ते फरार आहेत. दरम्यान, गेवराईचा आगार प्रमुख नवीन बसस्थानका समोर लाच घेताना जाळ्यात अडकला आहे. त्याने तक्रारदाराला, तुझा स्टोअरचा रिपोर्ट करणार नाही पण त्यासाठी तीस हजार रुपयाची लाच मागीतली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला उचलले असून, त्याची झाडाझडती घेतली जात आहे. गेवराई पोलीस ठाण्यात त्याच्यावर कारवाई सुरू आहे. काही वेळातच त्याला अटक करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
