बीड प्रतिनिधी
येथील भावसार समाजाची सर्वसाधारण सभा होऊन या सभेत बीड भावसार कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन अनिल सुत्रे यांची अध्यक्षपदी तर सचिव म्हणून चंद्रकांत धारूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील शाहू नगर भागातील सारिका ड्रेसेस ओंकार उपरे यांच्या निवासस्थानी भावसार समाजाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सर्व साधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर हे होते सुरुवातीला. अनिल सुत्रे यांनी प्रस्ताविक केले तर रंगनाथराव फटाले, रामचंद्र आमटे यांनी या सभेत मार्गदर्शन केले. यावेळी भावसार समाजातील समाजबांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती . यावेळी शहराध्यक्ष भावसार समाज अध्यक्ष म्हणून अनिल सूत्रे तर सचिव म्हणून प्रा.चंद्रकांतजी धारूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली, या निवडीनंतर लगेच नवनिर्वाचित यांचा सर्वांनी यथोचित गौरव आणि सत्कार केला . यानंतर सत्काराला उत्तर देताना अनिल सूत्रे म्हणाले की भविष्यात भावसार समाजाचा कायापालट करून एक आदर्श समाज म्हणून इतर समाजासमोर आपल्याला आदर्श निर्माण करायचा आहे . तर अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रकाश कानगावकरगावकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी बीड भावसार समाजाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आणि यापुढे येथील अडीअडचणीच्या वेळी मी संपूर्ण सहकार्य करील अशी ग्वाही दिली. या बैठकीस ज्ञानेश्वर आप्पा म्हळदकर,किशोर उपरे ,ओंकार उपरे, कृष्णा उपरे, रमेश मुळे सुधीर सरवदे दत्ता तळेकर,द्वारकादास फटाले, बालाजी कुसुमकर नारायण उपरे यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते .या निवडीमुळे सर्व समाजात आनंद व्यक्त करण्यात येत असून आता यापुढे बीड येथील आडून पडलेली समाज कामे यापुढे सुरळीत पार पार पडतील असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
