सलून उघडले पण ग्राहकच नाही
सलून व्यवसायिकांची उपासमार सुरूच
केज!नंदकुमार मोरे!
कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन मुळे जवळ जवळ दीड वर्षापासून अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत,
अशातच गेली दीड वर्ष दुकान भाडे, घर भाडे,विविध कर्जांचे हफ्ते भरू न शकल्याने सलून व्यवसाय करणारे महाराष्ट्रातील नाभिक बांधव दुकाने सुरू होऊन देखील आज आर्थिक आणि मानसिक विवंचनेत आहेत,
सरकारला वारंवार निवेदने देऊन देखील कोणत्याही प्रकारची प्रतिसाद न मिळाल्यामुळे सलून व्यवसायिक आज हलाखीचे जीवन जगत आहेत,
सरकारने आज लॉक डाऊन मधे जरी शिथिलता आणून सलून दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी कोरीनाच्या भीतीने दुरावलेल्या ग्राहकाला पुन्हा सळूनकडे वळवणे हे सर्वात मोठे आव्हान आज समस्त सलून व्यवसायिकांसमोर आहे,
त्यातून वेळेचे बंधन आणि किचकट नियमांमुळे व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे,
परिणामी दुकाने सुरू होऊन देखील ग्राहकांअभावी सलून व्यवसायिक बांधवांची उपासमार होताना सर्वत्र दिसत आहे.
कोरोनच्या लॉक डाऊन च्या काळात संपूर्ण सलून व्यवसायिक पुरता होरपळून निघाला आहे,
सलून व्यवसाय हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने आर्थिक समस्यांना कंटाळून जवळ जवळ २९ बांधवांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली आहे.
आजही सर्वच सलून व्यवसायिक स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपला व्यवसाय करीत आहेत,
वाढती महागाई,कौटुंबिक आणि वैद्यकीय खर्च,घर आणि दुकान भाडे,विविध बँकांच्या कर्जांचे हफ्ते या काळजीने उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे,
जिल्हानिहाय कोरोणाची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने नियमात शिथिलता आणली आली तरी कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही,
हीच भीती ग्राहक वर्गाच्या मनात असल्याने सलून व्यवसाय ठप्प झाला आहे,
राष्ट्रीय जनसेवा पक्ष आणि समाजातील संघटनांनी वारंवार सरकारला निवेदने देऊन देखील सरकारने अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे सकल सलून व्यवसायिक आज आर्थिक कोंडीत सापडला असून उत्पणाचे साधनच बंद पडल्याने समाजात उपासमारीचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे
अशा अवस्थेत आता सरकारी प्रोत्साहनाची आणि तातडीच्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे,कारण याच नाभिक समाजाने राज्याच्या प्रगतीत नेहमीच भरीव योगदान दिलेले आहे,समाज विकासासाठी आणि
आर्थिक शैक्षणिक परिवर्तनासाठी
लवकरात लवकर केश शिल्पी बोर्ड पूनार्गाठीत करण्याची मागणीही राष्ट्रीय जनसेवा पक्षा द्वारे करण्यात आलेली आहे,
सरकारने आता तत्काळ सहानुभूतीपूर्वक या सलून व्यवसायिकांना सर्वोतोपरी सहकार्य करून पारंपरिक सलून व्यवसाय वाचविण्यासाठी आणि व्यवसायिकांची होत असलेली उपासमार थांबविण्यासाठी योग्य त्या प्रकारे मदतीचा हाथ द्यावा असे आवाहन समाजसेवक श्री संजय पंडित यांनी केले आहे.