महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गेवराई तालुका इंग्लिश स्कूल असोसिएशनची अध्यक्षपदी विकास कोकाटे

गेवराई तालुका इंग्लिश स्कूल असोसिएशनची अध्यक्षपदी विकास कोकाटे 


गेवराई / प्रतिनिधी 
करोनाच्या जैविक संकटाचा फटका सर्वच उद्योग समूहांना बसला आहे. यात खाजगी शैक्षणिक संस्थांना खुप मोठा आर्थिक फटका बसला आहे. शाळा केव्हा सुरू होणार यावर प्रशासनाचे कोणीच वक्तव्य करत नाही. म्हणून आज कित्येक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. तसेच प्रसारमाध्यमांवर वक्तव्य करणाऱ्या लोकांमुळे पालकांची होत असलेली दिशाभूल याच पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील सर्व इंग्लिश स्कूलच्या संस्थाचालकांनी दिनांक २७/६/२०२१ रविवार रोजी गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे बैठक आयोजित करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी श्री. आर. के. चाळक , डॉ.बी.आर.मोटे , श्रीमंत सानप, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीत सध्या इंग्लिश स्कूल ज्या आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत त्याविषयी सकारात्मक पद्धतीने काम करुन शाळांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. तसेच बीड जिल्हा इंग्लिश मेडियम ट्रस्टीज असोसिएशनच्या गेवराई तालुका कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.  गेवराई तालुका इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी :विकास कोकाटे , उपाध्यक्षपदी : विनोद खराद, सचिव : सुमित बोर्डे , सहसचिव : मोहन ठाकर , कोषाध्यक्ष: गणेश तांबे, सदस्य : अमोल मस्के , विजय राठोड, संदीप वारे, भीमराव गावडे, शाम चाळक , आदींची निवड करण्यात आली. या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सरकारवर आर्थिक बोजा न पडता शिक्षणसंस्था उभ्या रहाव्या आणि त्यातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने स्वयं अर्थसहाय्यित शाळांना मंजूरी देण्यात आली, दर्जेदार शिक्षण देण्यासह शिक्षणाचे सार्वत्रिकरण व्हावे यासाठी सरकारने कायम विनाअनुदानित तत्त्वावर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळंना मान्यता दिल्या . आपल्या परिसरातील मुलांना चांगल्या शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थाचालकांनी  विद्यार्थ्यांसाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देत शाळेसाठी स्वतंत्र इमारत, प्रत्येक शिक्षकामागे एक वर्गखोली, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाकगृह, शाळेभोवती कंपाउंड, खेळाचे मैदान, अडथळाविरहित प्रवेशमार्ग (रॅम्प), बस सेवा , मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय आणि ग्रंथालय असे सर्व निकष पूर्ण करत संस्थाचालकांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत . आज प्रत्येक खाजगी शाळेचे संस्थाचालक आर्थिक अडचणीत आहेत. तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. पालकांनी देखील पालक म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे. आज पर्यंत गेवराई तालुक्यातील पालकांनी त्यांचे कर्तव्य अत्यंत निष्ठेने पार पडलेले आहे.    ही अपेक्षा संस्थाचालकांनी व्यक्त केली. आधारकार्ड लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांमुळे आमची आर. टी. ई. फिस प्रशासन देत नसेल तर प्रवेशादरम्यान प्रशासनाने आधार कार्ड सक्तीचे करणे आवश्यक आहे असे मत मोहन ठाकर यांनी व्यक्त केले. 


विशेष चौकट १ :
------------------------------
खरंच खाजगी शाळा बंद आहेत का ?
१. शिक्षक ॲानलाईन तासिका घेत आहेत . 
२. विद्यार्थी ॲानलाईन शिक्षण घेत आहेत.
३. खाजगी शिक्षकांचा पगार शाळांना करावा लागतो तो खर्च चालु. 
४. विद्यार्थ्यांच्या सुलभ प्रवासासाठी स्कूलने घेतलेल्या बसचे हाप्ते चालूच आहेत . 
५. काहींनी शाळेसाठी स्वतंत्र जागा घेतली तर काहींनी इमारत बांधली यांचे नॅशनल व इतर सर्व बॅंकेचे हप्ते मात्र चालूच आहेत. 
६. आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ॲानलाईन शिक्षणासाठी हजारो रुपयांचे नेटपॅक दरमहा चालूच आहे. 
७. शाळेतील कर्मचारी काही कर्मचारी यांचे पगार चालू. 
८. ॲानलाईन शिक्षणासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर होणारा खर्च चालू. 
९. पिण्याच्या पाण्यावर व इतर भौतिक सुविधांवर होणारा खर्च चालू.

 "सर्व बंद असताना विद्यार्थ्यांचे हीत जपणारा शिक्षक व संस्थापक यांच्याकडे समाजातील प्रत्येक घटकाने  माणुस म्हणून पाहा. प्रशासनाने व पालकांनी या काळात केलेले सहकार्य शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे असेल."
----------------


विशेष चौकट :२
------
लॅाकडाऊन मध्ये विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान याकडे प्रशासनाने गंभीरपणे पाहावं . नव नविन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावा. तसेच आर. टी. ई. ची फिस रखडल्याने सर्व शाळा आडचणीत असल्याने प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेणे अपेक्षित आहे. 
प्रा. आर. के. चाळक
------------
चौकट ३
गेवराई तालुक्यातील सर्व इंग्लिश स्कूल ने शिक्षणाचा दर्जा जपलेला आहे. याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला पाहिजे. काही शाळेंची आर.टी. ई. फिस जमा केली पण ज्यांची फिस रखडलेली आहे यांच्यावर अन्याय होत आहे हे आता थांबले पाहिजे. 
डॉ. बी. आर. मोटे .
———-