स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियनचे विविध मंत्र्यांच्या भेटून दिले मागण्यांचे निवेदन
मुंबई प्रतिनिधी
कामगार व ग्राम विकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांची आज दिनांक मंगळवार 1 जून 2021 रोजी सायंकाळी 4 वाजता भेट घेतली यांच्या बरोबर झालेल्या भेटी मध्ये कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ 2008 केंद्र सरकारच्या व राज्य सरकार ने जे 10 फायदे दिले आहेत त्याची त्वरित अंबलबजावणी सुरू करा तसेच आत्महत्या केलेल्या सलून कारागिर यांना 1000000/ रुपये तात्काळ मदत जाहीर करावी तसेच ग्रामीण/ शहरी भागातील कारागिरांना 20000/सानुग्रह अनुदान देण्यात यावे व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे स्वतः मंत्री महोदय म्हणाले मी मुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा करतो असे म्हणाले स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष श्री. प्रकाश चव्हाण,सुरेश तावरे,रमेश सोलंकी,राहुल रेळे,छगन परमार, अनंत चव्हाण पदाधिकारी उपस्थित होते
____________________________________________
आज दिनांक 2/6/2021 रोजी दुपारी 2.30 वा आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे साहेब यांची भेट घेतली त्यांना आम्ही सांगितले की सलोन व ब्युटी पार्लर हा व्यवसाय अत्यावश्यक सेवे मध्ये येतो व त्याचे पुरावे आम्ही त्यांना सादर केले, पुरावे पाहून व म्हणणे ऐकून घेतल्यावर ते म्हणाले की सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय अत्यावश्यक सेवेत येतो असा होकार दिला आणि हा विषय मी कॅबिनेट मध्ये आजच मांडतो असे त्यांनी आश्वासन दिले. सदर प्रसंगी स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी श्री प्रकाश चव्हाण. राहुल रेळे. सुरेश तावरे. चोगाराम परमार. रमेश सोलंकी. वीणा निमकर उपस्थित होते.
सेनसमाज, सलमानी समाज,गुजराती समाज,सविता समाज,नाभिक समाज यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे साहेब यांचे आभार मानले.