छंद माझा आवडीचा" स्पर्धेच्या माध्यमातून गेवराई किराणा व्यापारी संघटनेचा अभिनव उपक्रम
गेवराई (प्रतिनिधी ): लोकडाऊन काळात व्यापारी वर्गाने प्रशासनाचे नियम पाळून त्यांना शिस्त लागावी या प्रांजळ विचाराने बंद च्या काळात आपल्या रिकाम्या वेळेत त्यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा व त्याचे लहानपणीचे छंद पूर्ण व्हावे ह्या उद्देशाने गेवराई किराणा व्यापारी संघटनेने "छंद माझा आवडीचा" ही स्पर्धा आयोजित केली त्यास गेवराई करानी भरभरुन प्रतिसाद दिला. ही स्पर्धा २७ मे ते १५ जून मधील कालावधीत आपला छंद जोपासनाऱ्या लोकासाठी होती, आपली आवड आपल्यास आनंद देवू शकते.जर ते आपण मनापासून करू तर ते आणखी उत्कृष्ट होवू शकते हे या स्पर्धेद्वारे समजले. ह्या स्पर्धेत प्रथम विजेत्यास ३०००/- रोख व प्रमाणपत्र व्दितीय विजेत्यास २०००/- रोख व प्रमाणपत्र, तृतीय विजेत्यास १०००/- रोख व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप असून प्रथम क्रमांकासाठी श्री. अमर भोसले (श्री.सुपर मार्केट), यांना खास चित्रकला शैली साठी, व्दितीय क्रमांकासाठी श्री.जोजारे प्रभाकर (नांदेवालीकर सराफ) यांना पाठवन ह्या लेखासाठी तसेच
तृतीय क्रमांकासाठी श्री.अभिजीत काला (उन्नती शॉपी) यांची नको देवराया आता तरी छळू या लेखासाठी निवड करण्यात आली असून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.प्रताप खरात, किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब बरगे व श्री.सुरेंद्रअप्पा रुकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.