" जिगरी अंकुश "
शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांची एक संघटित नाळ जोडणारा ,पत्रकारांसाठी धावून येणारा पत्रकार म्हणजेच अंकुश, समाजातील सर्वसामान्यांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारा व आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा अन्यायावर अंकुश ठेवणारा म्हणजेच अंकुश, प्रशासनाला सर्वसामान्यांचे कामे आणि योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यात काही तफावत असली तर लेखणीच्या माध्यमातून ती सुरळीत करण्यासाठी आपला लेखणीच्या उपयोग करून प्रशासनाला देखील दिलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी भाग पाडणारा व त्यांच्यावर अंकुश ठेवणारा म्हणजेच अंकुश आपल्या संघटन कौशल्याचा च्या जीवावर तब्बल बारा वर्ष पत्रकारांचा अध्यक्ष राहुल संघटन कसे असते हे दाखवणारा माझा मित्र व जिगरी म्हणजेच अंकुश, दोस्ताना निभावत असताना आपले कर्तव्य चोख बजावणारा मित्र म्हणजे अंकुश दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजेच अंकुश आज या जिगरी आणि खमक्या मित्राचा वाढदिवस त्यानिमित्त शब्दरूपी शुभेच्छांचा वर्षाव आणि अंकुश ला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
आत्मविश्वासाच्या जीवावर तसेच शांत संयमी आणि गरज भासल्यास आक्रमक पवित्रा घेऊन सर्वसामान्यांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारा अंकुश ने मेहनत आणि जिद्द यांच्या जीवावर गेल्या बारा वर्षापासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत गेवराई येथील खमक्या अध्यक्ष म्हणून आपली छाप पाडली व गेवराई तालुक्यावर अधिराज्य करत आहे . नेहमी हसतमुख शांत संयमी आणि गरज भासल्यास आक्रमक पवित्रा घेऊन पत्रकारांच्या प्रश्न सोडून सर्वांचा चाहता अध्यक्ष म्हणून त्याने आपले अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली व कर्तव्य बजावले. दुनियादारीतील विश्वास पात्र मित्र म्हणून अंकुश नेहमीच आपल्या कार्याच्या माध्यमातून दिलदार व जिवलग मित्र असल्याचे नेहमी सिद्ध करून दाखवतो. अशा दिलदार व खमक्या अध्यक्षांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त त्याला लक्ष लक्ष शुभेच्छा आई जगदंबा आणि दत्तप्रभू अंकुश च्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण करो हीच प्रार्थना
जय महाराष्ट्र
प्रदीप जोशी
दैनिक सामना तालुका प्रतिनिधी गेवराई