पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन.
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना राज्यात असंख्य संस्था रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत,यातच आता रुग्णांना मदत करण्यासाठी "पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष" ची स्थापना करण्यात आली आहे,सदरील कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळवून देणे, रुग्णवाहिका,प्लाझ्मा,अवाजवी बिलासंदर्भात तक्रारींचे निवारण, महात्मा फुले जण आरोग्य ओयोजनेचा लाभ मिळवून देणे, पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ मिळवून देणे आदी कामे सदरील कक्षामार्फत करण्यात येणार आहेत,रुग्णांच्या मदतीसाठी राज्यात जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात कक्षाचे काम उस्मानाबाद, जालना, पुणे,सांगली,नाशिक या जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे,तसेच रूग्णांना सहकार्य व मार्गदर्शन कक्षाद्वारे करण्यात येणार आहे,रूग्णांच्या तक्रारी व अडचणीचे निवारण करण्यासाठी राज्यस्तरीय सहाय्यता कक्ष बनवण्यात येणार आहे,सदरील कक्षाचे काम नामदार श्री.जितेंद्र आव्हाड साहेब,आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आसल्यची माहिती अंगद माने यांनी दिली आहे.
कक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणीचे निवारण करून सदरील काम हे राज्यभर वाढवण्यासंदर्भात मा.ना.श्री.जितेद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा करून ठरवण्यात येणार आसल्यची माहिती दिव्य सारथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंगद माने यांनी दिली आली आहे