संवाद.संपर्क..संघर्षाचा संगम: रमेश पोकळे....
" सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले रमेश पोकळे विद्यार्थी, युवक,पदवीधर शिक्षक यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने गेल्या ३० वर्षापासून संवाद, संपर्क आणि संघर्षाच्या माध्यमातून संघर्ष करित आहेत. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात रमेश पोकळे यांची संघर्षाशील युवा नेता म्हणून ओळख निर्माण झाली, कोणती ही पूर्व राजकीय पाश्र्वभूमी नसतांना त्यांनी संघर्षाच्या आणि आपल्या संवाद संपर्क आणि संघर्षाच्या बळावर राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून संपूर्ण मराठवाड्यात हजारो नव्हे लाखो युवक,पदवीधर,शिक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. आज रमेश पोकळे यांचा वाढदिवस निमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा हा लेख'" ......
बीड जिल्ह्यातील चांदेगाव या छोट्याशा गावात एका सर्वसामन्य शेतकरी कुटुंबात युवा नेता रमेश पोकळे यांचा जन्म झाला. समाजकारण आणि राजकारण स्तरावर कोणतीही कौटुंबीक पार्श्र्वभूमी नसतांना रमेशराव पोकळे यांनी महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी चळवळीत प्रवेश करून समाजकारण आणि राजकारणास प्रारंभ केला. विश्वासनीयता,नम्र स्वभाव आणि कार्यमग्न हे रमेशरावांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये आहेत.
महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतांना विद्यार्थ्यांच्या युवकांच्या पदवीधरांच्या विविध प्रश्नावर आणि विद्यार्थी विरोधी शासन विद्यापीठ धोरणावर तिव्र विरोध करता विद्यार्थ्यांच्या युवकांच्या पदवीधरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यास भाग पाडणारे अनेक आंदोलने रमेशराव पोकळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी युुवकांना पदवीधरांना न्याय मिळावा यासाठी केवळ आंदोलने पुरेशे नाहीत. हे लक्षात घेवून त्यांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वरिष्ठ सभागृह असणा-या सिनेटची निवडणूक आपल्या सर्व सहकार्याना सोबत घेवून लढवली रमेशराव पोकळे यांच्या संवाद संपर्क संघर्षशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थायी समितीच्या चेअरमन पदी त्यांची निवड ही झाली. या पदाला त्यांनी प्रतिष्ठा आपल्या कर्तृत्वातून प्राप्त करून दिली.
विद्यापीठाच्या इतिहासात स्थायी समिती अत्यंत महत्त्वपूर्ण असते. विद्यापीठाचे ते वरिष्ठ सभागृह होय या सभागृहाच्या स्थायी समितीचा चेअरमन कसा असावा त्याचे कार्य किती प्रभावी असावे केवळ विद्यापीठ कर्मचारी आणि विद्यार्थी यांचेच प्रश्न रमेशरावांनी सोडवीले नाही तर विद्यापीठ कार्यकक्षेत्रातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या असंख्य जटील प्रश्नांना वेळोवळी न्याय देण्याचा प्रयत्न केला विद्यापीठाचा आणि संलग्नीत महाविद्यालयाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विद्यापीठाच्या विविध समित्यावर प्रभावी कार्य केले. त्यामुळे प्राथमिक ते विद्यापीठ स्तरावरील उच्च शिक्षण क्षेत्रात रमेशरावांनी संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली. देशात सर्वप्रथम घरपोहच पदवी वितरण अभियान राबवून सुमारे ३५ हजार पदवीधरांना घरपोच पदव्याचे वितरण केले. त्यामुळे त्यांचा गावागावात पदवीधरांशी स्नेह निर्माण झाला. अनेक प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी त्यांनी शासन विद्यापीठ अनुदान आयोग केंद्रशासन स्तरापर्यंत संघर्ष केला.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच रमेशरावांचे कृषी आणि सहकार या क्षेत्रातही मोेठे योगदान आहे. शासनाच्या कृषी विकास योजना शेतक-यांच्या दारापर्यंत पोव्हचविण्यात रमेशराव नेहमी प्रत्नशील असतात. कृषी विकास झाला तर शेतक-यांचा विकास होईल ही त्यांची भूमिका आहे. त्या बरोबरच सहकार चळवळ ही ख-या अर्थाने कृषी व ग्रामीण विकासाची गुरूकिल्ली आहे. हे ओळखून रमेशरावांनी सहकारी क्षेत्रात उल्लेखनीयस कार्य केले. त्यामुळे त्यांची बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाली.
रमेशरावांच्या कामाची धडाडी संघर्षाची क्षमता,नम्र स्वभाव आणि संबंध मराठवाडा स्तरावरील जनसंपर्क या बाबी लक्षात घेवून भा.ज.पा. जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी रमेशरावांची जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली होती. बँकेचा आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास (नाबार्ड) च्या माध्यमातून असंख्य कृषी विकासाच्या योजना त्यांनी शेतक-यांना मिळवून दिल्या त्यामुळे कृषी,सहकार आणि शिक्षण क्षेत्राचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्व म्हणून ही रमेश पोकळे यांची ओळख निर्माण झाली.
बीड जिल्ह्याचे भाग्यविधाते भा.ज.पा. जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब व आदरणीय पंकजा ताईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली रमेशराव पोकळे यांची भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष पदावरून जनहितार्थ संघर्ष केला. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यासह संपूर्ण मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची फळी उभा केली. या बरोबरच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी पक्षाची ध्येय धोरणे तळागळा पर्यंत पोव्हचविण्यासाठी तसेच भा.ज.पा. जेष्ठ नेते स्व. खा.गोपीनाथराव मुंडे यांचे विचार भूमिका अखेरच्या घटकापर्यंत पोव्हचविण्यासाठी आदरणीय पंकजातार्इंच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करित आहेत. बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीत खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा यशस्वीपणे सांभाळून गावा गावात नव्या कार्यकत्यांची फळी उभा करून एक नवी ताकद खा.डॉ प्रितमताई मुंडे व महाराष्ट्राची वाघीण आदरणीय पंकजा ताईसाहेबांच्या पाठीशी उभी करून निवडणूक यशस्वी पार पाडली. बीड लोकसभा मतदार संघातील २०१४ पासून ते २०१९ची निवडणूक रमेश पोकळे यांच्या कार्याची धडाडी विरोधी पक्ष नेत्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. पक्षासाठी,स्वतःला अखंड वाहून घेणारे रमेश पोकळे पक्षासाठी तन मन आणि धन लावून काम करिता आहेत. हे विशेष. निखळ मनाने समाजकारण आणि राजकारण करणा-या रमेश पोकळे यांचे एक-एक पाऊल पुढे पडत आहे. त्यामुळे या जिल्ह्याला आगामी काळात सुसंस्कृत चारित्र्य संपन्न व निखळ नेतृत्व मिळणारे आहे यात शंकाच नाही. बीड जिल्ह्यातील बालाघाट पर्वताच्या कुशीत वाढलेले संघर्षशील नेते रमेश पोकळे सुसंस्कृत चारित्र्यवान, ध्येयनिष्ठ, अखंडसंपर्क , आणि सदैव पर्यंतशिल असलेल्या उमद्या युवा नेतृत्वाला पक्ष नेत्यांनी रसद पूरविण्याची गरज आहे.यामुळे पक्ष आणि नेतृत्वाचा उत्कर्ष होणार आहे.परंतू दुर्दैवाने राजकीय क्षेत्रात पक्षशिस्त आणि पक्ष निष्ठा खुंटीवर ठेवून उगवत्या सूर्याला नमस्कार करणार्या बहूपक्ष निष्ठावंताची चलती असली तरी निष्ठेचे फळ उशिरा मिळतं.हे कटू सत्य आहे.संवाद, संघर्ष आणि जनसंपर्कचा सुरेख संगम असणारे रमेशभाऊ यांना वाढदिवसानिमित्त खुप खूप शुभेच्छा...
प्रासंगिक: प्रा. डॉ.नामदेव सानप.