बौद्ध जयंतीचे औचित्य साधत मोजक्याच अनुयायीच्या उपस्थितित
पार पडला बौद्धमय आदर्श मंगल परिणय.
===============
गेवराई/ प्रतिनिधी
देशाच्या राजधानी दिल्ली सह देशात व राज्यभरात कोविड 19 मुळे सर्वच विधी विधाने आटोक्यात आणत विविध सामाजिक रुढी आप आपल्या परीने पार पाडत आसल्याचे मागील वर्षाच्या लाॅकडाउन ते सध्यस्थिती पर्यंत दिसुन येते. सामाजिक विधि पार पाडत आसतांना सर्वच समाज बांधव, भाऊ बंदकी, सोयरे धायरे नाराज होणार नाही याची दक्षता घेतात परंतु तलवाडा येथील आयु. अर्जुन तुळशीराम डोंगरे यांच्या परीवारांने या लाॅकडाउनच्या काळात बौद्ध जयंतीचे औचित्य साधत फक्त पंधरा अनुयायीच्या उपस्थिति मध्ये प्रेरणादायी व आदर्श युक्त विवाह योग घडवून तो संविधान प्रतीज्ञा घेत सर्व उपस्थितितांना एक एक संविधान प्रत व एक एक झाड देऊन गायत्री बाल संस्कार , विद्या मंदिर, बालवाडी, येथे आदर्शयुक्त मंगल परिणय सोहळा गेवराई येथे पार पाडला . या विवाह प्रसंगी बौद्ध जयंतीच्या अनुषंगाने सर्व महा पुरुषांच्या प्रतीमा समोर ठेऊन पुष्प हार अर्पित करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी वधु वरांच्या मोजक्याच कुटुंबा सोबत डी. फार्म काॅलेजचे मा. प्राचार्य श्री. महासाहेब व सौ.सीता राम महासाहेब, राज्य महिला संघटक, पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था,भारत, आर. पी. आयचे अध्यक्ष किशोर कांडेकर, अॅड निकम सर, बांगर सर, संपादक सुनिल पोपळे, मोहन डोंगरे, उत्तम भोले आशोक गायकवाड हे उपस्थित होते. उच्च शिक्षित अविनाश (D.pharm, B.pharm & M.pharm) व प्रज्ञा ( B.Tech & MBA) या तरुण व तरुणीने व्यर्थ खर्च टाळत प्रत्येकाला पर्यावरण, महापुरुषा प्रती आदर भाव राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा या मंगल परिणयाच्या माध्यमातुन संदेश दिला. ही सर्व संकल्पना अविनाश चे बंधु सचिन डोंगरे सर यांनी घडुन आणल्या बद्दल उपस्थिति मान्यवरांनी त्यांचे कौतुक करुन अभिनंदन करत वधु प्रज्ञा व वर अविनाश यांना भावी वाट चालीस शुभेच्छा दिल्या.